श्रद्धा हत्याकांड प्रकरणः दिल्ली पोलिसांना आले मोठे यश, जंगलात सापडली कवटी आणि हाडांचे तुकडे

157

संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवनवीन माहिती समोर येत असताना रविवारी दिल्ली पोलिसांना या प्रकरणात मोठे यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने रविवारी घेतलेल्या मेहरौलीच्या जंगलातून त्यांना एक मानवी कवटी आणि जबड्याचा काही भाग सापडला असून, हे अवशेष 27 वर्षीय श्रद्धाचे असू शकतात, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, हे अवशेष फॉरेन्सिक चाचणीसाठी लॅबमध्ये नेण्यात येणार असून त्यानंतरच याबाबत उलगडा होणार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः ‘श्रद्धा वालकर हत्येसारखे प्रकार ‘या’ कारणामुळे घडतात’, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे स्पष्ट मत)

पोलिसांच्या हाती हाडे आणि कवटी

रविवारी दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचे अवयव शोधण्यासाठी मेहरौलीच्या जंगलात जंग जंग पछाडले. दिल्ली पोलिसांच्या तब्बल 200 जणांच्या तुकडीने या जंगलात रविवारी शोध घेतला. यावेळी पोलिसांना एक मानवी कवटी आणि जबड्याचा काही भाग सापडला असून, शरीरातील वेगवेगळे 17 हाडांचे तुकडे सापडले आहेत. शरीराच्या या अवशेषांची आता फॉरेन्सिक चाचणी करण्यात येणार आहे. ही हाडे श्रद्धाचीच आहेत याची खात्री पटवणे कठीण असून त्यासाठी डीएनए चाचणी देखील करण्यात येणार आहे.

पोलिसांचा कसून शोध

दरम्यान, श्रद्धाचे शीर छतरपूर एनक्लेव्ह येथील एका तलावात फेकल्याची माहिती श्रद्धाचा मारेकरी आफताबने दिली होती. त्यानुसार दिल्ली पोलिस आणि महापालिकेच्या तुकडीने रविवारी हे तलाव उपसून काढले. त्यातूनही वेगळी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.