Shraddha Murder Case: आफताबला डेट करणा-या तीन तरुणींची दिल्ली पोलिसांकडून चौकशी

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा तपास करणारे दिल्ली पोलीस वसईत दाखल झाले आहेत. वसईमध्ये दिल्ली पोलिसांनी आफताब आणि श्रद्धा यांचे शेजारी, मित्रपरिवाराची चौकशी केली आहे. तसेच, डेटिंग अॅपवरुन आफताबला भेटलेल्या तीन तरुणींची चौकशी दिल्ली पोलिसांनी केली. वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी ही चौकशी करण्यात आली.

दिल्ली आणि वसई पोलिसांनी या चौकशीबाबत कोणतीही माहिती उघड केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आफताब पुनावाला डेट करत असलेल्या चार पैकी दोन तरुणींचा वसई पोलीसांकडून शोध सुरु आहे. तसेच, मंगळवारी चौकशी करण्यात आलेल्या तरुणी या हत्येच्या आधी आणि नंतरही आफताबच्या संपर्कात होत्या. त्याशिवाय त्यांच्यात फोनवरुन संभाषणदेखील झाले असल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा: आता ST स्टॅण्ड होणार फाईव्ह स्टार; ‘या’ बसस्थानकांचा होणार विकास )

आफताबची नार्को टेस्ट केली जाणार 

पोलिसांकडून श्रद्धाचे मित्र- मैत्रिणी, कार्यालयातले सहकारी, नातेवाईक असे अंदाजे 20 हून अधिक लोकांचे जबाब घेतले गेले आहेत. बहुतेक जणांनी त्यांच्या श्रद्धासोबत केलेले चॅट किंवा काॅलबाबतची माहिती आणि पुरावे पोलिसांना दिले आहेत. तर, दुसरीकडे पोलिसांकडून आफताबची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here