आफताबचे ७० तुकडे करा; त्याची आमच्या मालमत्तेवर नजर होती…श्रद्धाच्या वडिलांचा खुलासा

162

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी संपूर्ण देश हादरला. या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला सध्या कोठडीत आहे. अशातच आता श्रद्धाच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

( हेही वाचा : IPL मिनी लिलावात कोणता संघ मारणार बाजी? ‘या’ खेळाडूंवर असणार विशेष लक्ष )

आमच्या मालमत्तेवर आफताबची नजर होती

आफताबने नियोजन करून श्रद्धाची हत्या केल्याचे विकास वालकर यांनी आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. त्याने माझ्या मुलीचा ब्रेनवॉश केला तसेच त्याची आमच्या मालमत्तेवर नजर होती असा धक्कादायक खुलासाही विकास वालकर यांनी मुलाखतीदरम्यान केला आहे. आफताबशी मैत्री झाल्यावर श्रद्धाने आमच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली होती. आफताबने श्रद्धाकडे धर्माच्या नजरेतून पाहिले होते. आफताबशी मैत्री झाल्यानंतर आमची सर्वसामान्य मुलगी आमच्याशी संपत्तीवरून वाद घालत होती असेही त्यांनी सांगितले.

आफताबचे ७० तुकडे करावेत…

आफताबला त्याने केलेल्या कृत्याबद्दल काहीही वाटत नाहिये आणि दुसरीकडे मला माझ्या मुलीसाठी मी काहीच करू शकलो नाही याचे वाईट वाटत आहे. त्याला बाहेरून कोणाचा तरी पाठिंबा असावा असा दावा विकास वालकर यांनी केला आहे. माझ्या हातात शिक्षा देण्याचा निर्णय असता तर माझ्या मुलीचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचे ७० तुकडे करावेत अशी शिक्षा दिली असती असे विकास वालकर यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.