Shraddha Murder Case : श्रद्धाची हाडे, कपडे कुठे फेकले? आफताबने नार्को टेस्टमध्ये दिले उत्तर…

114

आफताब पूनावालाने लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली असून या टेस्टमध्ये आफताबने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. दिल्लीतील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एफएसएलच्या तज्ज्ञ पथकाकडून आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली आहे. पॉलीग्राफ चाचणीमध्ये आफताबने अनेक उत्तरे टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्या नार्को टेस्टकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

( हेही वाचा : India Post Payment Bank : पोस्टात अकाऊंट आहे? बॅंकेने ग्राहकांसाठी जारी केल्या विशेष सूचना )

नार्को टेस्टमध्ये कबुली 

नार्को टेस्ट दरम्यान आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. नार्को टेस्टमध्ये श्रद्धाची हत्या केल्यावर तिचा मोबाईल, हाडे आणि कपडे कुठे फेकले याचे उत्तर सुद्धा आफताबने दिले आहे. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे, करण्यासाठी कोणते शस्त्र वापरले याचा खुलासा सुद्धा त्याने केला आहे.

श्रद्धाचे वालकरच्या वडिलांचे सुद्धा आफताबसोबत अनेकदा खटके उडाले आहेत. श्रद्धाची हत्या करणारा आफताब माणिकपूर पोलिसांनी उशिरा तक्रार दाखल केल्यामुळे उजळ माथ्याने वावरत राहिला असा आरोप श्रद्धाच्या चुलत भावाने केला आहे.

झोमॅटो डिलिव्हरीच्या तारखांमुळे मोठा ट्विस्ट

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झोमॅटो फूड डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे आफताबच्या फोनवरून फूड ऑर्डर केल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या तारखांनुसार १८ मे पूर्वी आफताब दोन लोकांसाठी जेवण ऑर्डर करत होता, तर त्यानंतर आफताब फक्त एका व्यक्तीसाठी जेवण ऑर्डर करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब विविध अ‍ॅप्सवरून जेवण मागवत होता. मे महिन्याच्या अखेरिस त्याने ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याचे प्रमाण कमी केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.