तुकडे करून ठार मारलेल्या Shraddha Walker च्या वडिलांचा मृत्यू

200
तुकडे करून ठार मारलेल्या Shraddha Walker च्या वडिलांचा मृत्यू
तुकडे करून ठार मारलेल्या Shraddha Walker च्या वडिलांचा मृत्यू

श्रद्धा वालकरच्या (Shraddha Walker) हत्येने संपूर्ण देश हादरून गेला होता. श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर (Vikas Walkar) यांचे निधन झाले आहे. श्रद्धाच्या (Shraddha Walker Murder Case) वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. श्रद्धाची (Shraddha Walker) हत्या झाल्यापासून तिचे वडील डिप्रेशनमध्ये गेले होते. वसईत राहत्या घरी त्यांचं निधन झालं आहे.

हेही वाचा-31 Maoists killed : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार, २ जवान हुतात्मा

तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने (Aftab Poonawala) तिची हत्या केली होती. या हत्येचा खटला न्यायालयात सुरू आहे. आपल्या मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून विकास वालकर न्यायालयीन खटला लढत होते. यावेळी त्यांची प्रचंड धावपळ होत होती. तसेच ते सतत तणावात होते. (Shraddha Walker)

हेही वाचा-इथून पुढे ‘त्या’ लाडक्या बहि‍णींना योजनेचा लाभ घेता येणार नाही; CM Devendra Fadnavis यांनी केलं स्पष्ट

विकास वालकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आपल्या मुलीला (Shraddha Walker) मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून विकास वालकर न्यायालयीन खटला लढत होते. विशेष म्हणजे सहा महिन्यानंतर श्रद्धाचे (Shraddha Walker) वडील विकास यांनी मुलगी हरवल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. आज विकास वालकर यांचा अचानक मृत्यू झाल्याने श्रद्धा वालकरच्या आरोपीला फाशी कधी मिळणार, असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. (Shraddha Walker)

हेही वाचा-अमरावती जिल्हा बँक अध्यक्ष Bachu Kadu यांना सहकार विभागाची नोटीस; काय आहे प्रकरण ?

आफताबने श्रद्धाची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा जाळून टाकला होता. रात्रीच्यावेळी तो घरातून बाहेर पडायचा आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा. दिल्ली पोलिसांनी 12 नोव्हेंबर 2022मध्ये आफताबला अटक केली. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात (Tihar Jail) आहे. आफताबसोबत रिलेशनशीपमध्ये येण्यापूर्वी श्रद्धा ही आई वडिलांसोबत वसईला राहत होती. (Shraddha Walker)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.