कल्याणच्या खडकपाडा भागात अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना (Kalyan Marathi Family Case) घडली आहे. कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत ही घटना ( Kalyan Crime ) घडली आहे. अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) यांनी अभिजित देशमुख (Abhijit Deshmukh) यांना गुंड बोलवून मारलं, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत विधानपरिषदेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच आरोपी अखिलेश शुक्लाचं निलंबन केल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. (CM Devendra Fadnavis)
हेही वाचा-संतोष देशमुख प्रकरणात आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार; CM Devendra Fadnavis यांची घोषणा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असे उद्गार काढले. यातून एक संतापाची लाट मराठी माणसामध्ये तयार झाली आहे. अखिलेश शुक्ला हा MTDC चा कर्मचारी आहे. याप्रकरणी पत्नीसह त्याच्यावर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद झाला आहे. त्याचं तत्काळ निलंबन देखील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.” (CM Devendra Fadnavis)
“मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाच आहे , मराठी माणसाचाच राहील. कधी-कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भाजपचं सरकारचं आलं म्हणून हे झालं अशाप्रकराचं राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं. कारण आपण राजकाणात शिरलो तर मुंबईतील मराठी माणूस हद्दपार का झाला? कुणाच्या काळात झाला? का मराठी माणसाला मुंबईतून ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि त्याच्या पलिकडे जावं लागलं?” असा सवाल फडणवीसांना विरोधकांना विचारला. (CM Devendra Fadnavis)
“काही लोक माजोरड्यापणाने बोलतात. त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला गालबोट लागलं. मात्र मी ठणकावून सांगतो कुठल्याही मराठी माणसावर येथे अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य संविधानाने दिलं आहे. मात्र शाखाहारी-मासांहारी भेदभाव करणे मान्य करता येणार नाही. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यातर योग्य कारवाई केली जाईल. आम्ही मराठी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. त्यावर कुणी घाला घालत असेल तर त्यांच्यावर निश्चिक कडक कारवाई केली जाईल.” असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (CM Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community