SIM Hacking : सीम हॅकरचा स्टील व्यावसायिकाच्या बँक खात्यावर दरोडा; साडेसात कोटी वळते केले

123
SIM Hacking : सीम हॅकरचा स्टील व्यावसायिकाच्या बँक खात्यावर दरोडा; साडेसात कोटी वळते केले
SIM Hacking : सीम हॅकरचा स्टील व्यावसायिकाच्या बँक खात्यावर दरोडा; साडेसात कोटी वळते केले
मुंबईतील मालाड येथील धक्कादायक माहिती समोर आली आहे, स्टील व्यापारी असलेल्या गुप्ता बंधूंचे मोबाईल सिम हॅक करून हॅकरने त्यांच्या बँके खात्यावर साडेसात कोटींचा दरोडा टाकला आहे. मोबाईल मेसेज आणि कॉल येत नसल्यामुळे मोबाईल सिम गॅलरीत गेल्यानंतर सीमकार्ड हॅक करून हॅकरने त्याच्या कंपनीच्या बँक खात्यातून साडेसात कोटी दुसऱ्या बँक खात्यावर वळते केल्याचे गुप्ता बंधूंच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी काही बँक खाती गोठवून साडेचार कोटी वाचवले आहे. (SIM Hacking)
मालाड पश्चिम येथे राहणारे विनोद गुप्ता (६५) यांचा स्टील ट्रेडिंगचा व्यवसाय आहे,त्यांची मुले विकास आणि वरुण हे दोघे वडिलांच्या व्यवसायात आहे, त्यांचे कार्यालय देखील मालाड पश्चिम येथे आहे.तक्रारदार विकास गुप्ता यांनी सांगितले की, २२ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गुप्ताच्या नातेवाईकांनी तक्रार केली की त्याच्या वडिलांचे आणि भावाचे मोबाईल फोनवर रिंग वाजते मात्र ते फोन घेत नाही.त्यांचा हा मोबाईल क्रमांक त्याच्या कंपनीच्या बँक खात्याशी संलग्न असल्यामुळे गुप्ता बंधूनी एअरटेल गॅलरीमध्ये जाऊन चौकशी केली असता त्यांचे सिमकार्ड ई-सिममध्ये रूपांतरित झाल्याचे सांगण्यात आले, गुप्ताने दावा केला की त्याच्या वडिलांना आणि भावाला सिम स्वॅप करण्यासाठी कोणतेही ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) किंवा सूचना मिळाल्या नाहीत आणि त्यांना शंका आहे की ही प्रक्रिया आपोआप झाली. एअरटेलच्या कर्मचाऱ्याने त्यांना त्यांचे बँक खाते तपासण्याचा सल्ला दिला.गुप्ता यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि कंपनीच्या बँक खात्यांची तपासणी केली असता, त्यांना धक्काच बसला,त्यांच्या कंपनीच्या आयसीआयसीआय बँक खात्यांमधून आयडीएफसी, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, आयडीबीआय आणि इतर अनेक बँकांमधील विविध खात्यांमध्ये ७.५० कोटी रुपये वळते करण्यात आले आहेत.२१ डिसेंबर सकाळी ९.५० ते २३ डिसेंबर सकाळी ११.२१ दरम्यान हा प्रकार  घडला असून जवळपास ८० विविध बँक खात्यावर व्यवहार करण्यात आले होते. (SIM Hacking)
गुप्ता यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला आणि सोमवारी तक्रार दाखल केली. सध्या, पोलिस व्यवहारांची चौकशी करत आहेत आणि शक्य असेल तिथे आरोपींची खाती गोठवत साडेचार कोटी वाचवले आहे. हॅकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे..गुप्ता यांनी पोलिसांना सांगितले की, “माझ्या वडिलांना आणि भावाला कोणताही ओटीपी आलेला नाही, किंवा त्यांनी कोणत्याही लिंकवर क्लिक केले नाही. अधिकाऱ्यांच्या मते, हॅकरने त्यांचे सिम क्लोन करून त्यांच्या मोबाईल क्रमांका ज्या बँक खात्याला जोडला आहे त्या खात्यावर नियंत्रण मिळवून सर्व व्यवहार नेटबँकिंग द्वारे करण्यात आले आहे, हॅकरने हे व्यवहार करण्यासाठी शनिवारी आणि रविवार हे दिवस निवडले कारण या दिवशी बँका तसेच मोबाईल गॅलरी बंद असते. ” एकूण ८० बँक खात्यावर गुप्ता यांच्या कंपनीच्या खात्यावरून रकमा वळत्या करण्यात आलेल्या असून त्यापैकी काही खाती आम्ही गोठवली असून जवळपास साडेचार कोटी वाचवले असल्याचे पोलिसांनी सांगितले. (SIM Hacking)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.