सिंधुदुर्ग पोलीस अॅक्शन मोडवर; शिल्पकार Jaideep Apte विरोधात लुक आऊट नोटिस जारी  

186
सिंधुदुर्ग पोलीस अॅक्शन मोडवर; शिल्पकार Jaideep Apte विरोधात लुक आऊट नोटिस जारी  
सिंधुदुर्ग पोलीस अॅक्शन मोडवर; शिल्पकार Jaideep Apte विरोधात लुक आऊट नोटिस जारी  

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Malvan Rajkot Fort) उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन एस. पाटील याला अटक केली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई करत चेतन पाटील याला कोल्हापूरमधून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे (Jaideep Apte) हा अद्याप फरार असून त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आऊट नोटीस (Jaideep Apte Lookout Notice) जारी केली आहे. (Jaideep Apte)

गेल्या आवठड्यात मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला होता. त्यानंतर या प्रकरणात बांधकाम सल्लागार डॉ. चेतन एस पाटील आणि कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीचा मालक जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेतन पाटीलकडे पुतळ्याचा चबुतरा बांधण्याची जबाबदारी होती. त्याला अटक करण्यात आली आहे. पुतळा पडल्याची माहिती समोर येताच जयदीप आणि त्याच्या पत्नीने कल्याण येथील घराला कुलूप लावून घर सोडले होते. त्यानंतर जयदीप आपटेची पत्नी माहेरी गेली होती. परंतु, जयदीप आपटे याचा नेमका ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. पोलीस सध्या त्याच्या कल्याणच्या घराबाहेर तळ ठोकून आहेत. अखेर सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटे विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे. पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. (Jaideep Apte)

(हेही वाचा – लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार, CM Eknath Shinde यांचा इशारा; म्हणाले, आरोपींना थेट…)

जयदीप आपटेच्या (Jaideep Apte Lookout Notice) शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी (Sindhudurga police) सात पथके तयार केली असून पाच पथके मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना केली आहेत. तर, दुसरीकडे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला अटक झाली असून सध्या तो ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांपूर्वी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. दुर्दैवाने पुतळा कोसळला. संबंधित घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी देखील मागितली आहे.  (Jaideep Apte)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.