भाड्याने लॅपटॉप घेऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरच्या विरुद्ध शिवाजी पार्क, जोगेश्वरी, वनराई आणि अंधेरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याने जवळपास ४०० लॅपटॉपचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
मनोज गौड असे अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरचे नाव असून तो जोगेश्वरी परिसरात राहण्यास आहे, मनोज गौड हा उच्च शिक्षित आहे. मनोज गौड याने मुंबईतील अनेक जणांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी वनराई, शिवाजी पार्क, जोगेश्वरी आणि अंधेरी पोलीस ठाण्यात मनोज गौड याच्या विरुद्ध मागील तीन महिन्यांपासून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात २३८ लॅपटॉपचा अपहार, वनराई मध्ये ७४ लॅपटॉप, अंधेरी ८५ लॅपटॉप आणि जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे ३६ लॅपटॉप अपहार केल्याचा गुन्हा मनोज गौड याच्यावर दाखल आहे. मनोज गौड हा आपली स्वतःची कंपनी उघडायचा आणि इतर कंपन्याकडून तो लॅपटॉप भाड्याने घ्यायचा, भाडे न देता परस्पर लॅपटॉपचा अपहार करून फसवणूक करायचा अशी पद्धत मनोज गुन्हा करण्यासाठी वापरत होता.
(हेही पहा – Chandrayaan-3 : महाराष्ट्राचे चंद्रयान मोहिमेत काय आहे योगदान?)
शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण शाखा कक्ष ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोनि. सुनीता भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय बेंडाळे, सपोऊनि. अंकुश न्यायनिर्गुणे आणि प्रमोद पाटील या पथकाने तांत्रिक पद्धतीने शोध घेतला असता आरोपी मनोज गौड दिल्ली येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथक दिल्लीला रवाना झाले आणि दिल्लीतील नजबनगर येथून मनोज गौड याला अटक करून मुंबईत आणण्यात आले आहे. पुढील तपासासाठी त्याचा ताबा शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडे देण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community