DGP : १ जानेवारी रोजी डीजीपीचा पदभार स्वीकारतील ‘हे’ ज्येष्ठ आयपीएस अधिकारी

ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदाची अधिकृत घोषणा केली जाणार असून १ जानेवारी रोजी रश्मी शुक्ला या महासंचालक पदाचा पदभार स्वीकारतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

409
DGP : १ जानेवारी रोजी डीजीपीचा पदभार स्वीकारतील 'हे' ज्येष्ठ आयपीएस अधिकारी
DGP : १ जानेवारी रोजी डीजीपीचा पदभार स्वीकारतील 'हे' ज्येष्ठ आयपीएस अधिकारी

महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक पदाचा तिढा शनिवारी (३० डिसेंबर) रात्रीतून सुटण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची पोलीस महासंचालक पदाची अधिकृत घोषणा केली जाणार असून १ जानेवारी रोजी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या महासंचालक पदाचा पदभार स्वीकारतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या महासंचालक पदाचे दावेदार म्हणून दोन महिण्यापूर्वीच ज्येष्ठ आयपीएस अधिकारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, तसे वृत्त देखील प्रसारित करण्यात आले होते. ३१ डिसेंबर २०२३ रोजी सेवानिवृत्त होणारे राज्य पोलीस दलाचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) यांना दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपद देण्यात आले. (DGP)

रजनीश सेठ स्वेच्छानिवृत्ती घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील आणि शुक्ला या पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारतील असे पोलीस दलाला अपेक्षित होते. मात्र रजनीश सेठ यांनी स्वेच्छानिवृत्ती न घेता त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणारे रजनीश सेठ (Rajnish Seth) यांना शुक्रवारी पोलीस दलाकडून मानवंदना देऊन सेवा निवृत्तीची परेड काढण्यात आली. (DGP)

(हेही वाचा – Mumbai Riots : जरांगे-पाटलांचा मुंबईत ३ कोटी जमाव जमवण्याचा इशारा; यापूर्वी कोणकोणत्या आंदोलनांमुळे हादरलेली मुंबई?)

पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) यांच्या सेवानिवृत्ती नंतर पोलिस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, परंतु सरकारकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात न आल्यामुळे पोलीस महासंचालक पदाचा तिढा पुन्हा वाढला. अनेकांनी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचे नाव स्वघोषित करून अनेकांनी सूत्रांची सांगण्या वरून रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची पोलीस महासंचालक पदासाठी नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले. अनेकांनी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या या पदासाठी निवड होण्याबाबत काही काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले, राज्याचे पोलीस महासंचालक पदासाठीचा कार्यकाळ हा किमान १८० (६ महिने) दिवसपेक्षा अधिक असावा आणि रश्मी शुक्ला ३० जून २०२४ मध्ये सेवानिवृत्त होत असून ३० डिसेंबर २०२३ ही कालावधी पकडली तर शुक्ला यांची कालावधी कमी पडते त्यामुळे त्यांची या पदासाठी नियुक्ती होणे अशक्य असल्याची चर्चा सुरू होती. (DGP)

दरम्यान पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा होती की, रश्मी यांच्या नावाला राजकीय वर्तुळातून तसेच आयपीएस लॉबीमधून विरोध असल्यामुळे त्यांची नियुक्ती लांबणीवर पडली आहे. तर रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक पदापेक्षा मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी उत्सुक आहेत, त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी त्यांना पोलीस महासंचालक पदावर नियुक्त (अधिकृत घोषणा नाही) करून देखील त्या उत्सुक नव्हत्या अशी देखील चर्चा पोलीस दलात सुरू होती. अखेर पोलिस महासंचालक पदाचा तिढा रात्री उशिरा सुटणार असून रात्री उशिरा पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, १ जानेवारी २०२४ रोजी रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारतील अशी माहिती सूत्रांनी दिली. (DGP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.