महाविकास आघाडीच्या महामोर्चावर अडीच हजार पोलिसांचा वॉच

132

महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी तयारी केली आहे. दक्षिण मुंबईतून निघणाऱ्या मोर्चासाठी अडीच हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. या मोर्चावर पोलिसांकडून ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे, त्याचबरोबर राज्य राखीव दलाची अतिरिक्त कुमक मुंबईत मागविण्यात आलेली आहे.

( हेही वाचा : दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त १४ कॅबिनेट मंत्री; कोणाचा पत्ता कट?)

मुंबईत शनिवारी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा नागपाडा येथील रिचर्ड अँड क्रूडास येथून सर जे.जे.उड्डाणपूल येथून आझाद मैदान येथे जाणार आहे. पोलिसांकडून या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक असून या बैठकीत महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या बंदोबस्त संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. या मोर्चासाठी अडीच हजार पोलीस रस्त्यावर उतरणार आहे, भायखळा खडा पारसीपासून ते आझाद मैदान पर्यंत चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे.

दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि ५ पोलीस उपायुक्त दर्जाचे २ अधिकारी संपूर्ण मोर्चा हातळणार आहे. मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष काळजी जाणार आहे. मोर्चावर व त्यात सामील झालेल्यांवर ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.