Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याच्या प्रक्रियेला वेग

36
Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याच्या प्रक्रियेला वेग
  • प्रतिनिधी

मुंबई पोलिसांनी मागील तीन महिन्यांत अटक केलेल्या ५०० बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) त्यांच्या देशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात डिटेशन सेंटरच्या कमतरतेमुळे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi Infiltrators) ठेवण्यासाठी अडचण येत असल्यामुळे त्यांची त्यांच्या देशात रवानगी करण्यात येत आहे. रवानगी करण्यात आलेले बांगलादेशी पुन्हा भारतात घुसखोरी करणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

भारतात बांगलादेशी घुसखोरांचे (Bangladeshi Infiltrators) प्रमाण वाढल्यामुळे सरकार समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पश्चिम बंगाल मार्गे भारतात घुसखोरी करून बांगलादेशी घुसखोर भारतातील विविध राज्यात बेकायदेशीर वास्तव्य करीत आहे. मागील काही वर्षांत बांगलादेशी घुसखोरांचे (Bangladeshi Infiltrators) प्रमाण वाढलेले आहे. दलालांमार्फत हे बांगलादेशी घुसखोर भारतीय असल्याचे बोगस कागदपत्रे तयार करून अनेक वर्षांपासून भारतातील प्रत्येक राज्यातील मुख्य शहरामध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहे. मागील काही महिन्यांपासून या बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रत्येक राज्यातील तपास यंत्रणा कामाला लागली आहे.

(हेही वाचा – Kapil in Captaincy : भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कपिल देवची ‘या’ खेळाडूला पसंती)

मुंबई पोलिसांनी या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत पासपोर्ट (भारतात प्रवेश) नियम, १९५० आणि परदेशी कायदा, १९४६ अंतर्गत ३०७ एफआयआर नोंदवले आहेत. या कालावधीत सुमारे ५०० बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्याला हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या वर्षी आम्ही १८० बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी बांगलादेशात (Bangladeshi Infiltrators) पाठवले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. गेल्या तीन महिन्यांत शहरातून एकूण ५०० बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

डिटेंशन सेंटर्सचा अभाव असल्याने अडचणी

अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांनी (Bangladeshi Infiltrators) आधार कार्डसारखे बनावट कागदपत्रे मिळवली होती आणि काहींनी बनावट पासपोर्टही बनवले होते. कायद्याच्या अंमलबजावणीसमोरील एक आव्हान म्हणजे डिटेंशन सेंटर्सचा अभाव आहे. जिथे देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या व्यक्तींना त्यांची हद्दपारी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ठेवण्यात येते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे समर्पित डिटेंशन सेंटर नाही. त्यामुळे आम्हाला त्यांना आझाद मैदान येथील पोलिस लॉकअपमध्ये ठेवावे लागेल. मुंबई पोलिसांच्या आय शाखेचे अधिकारी स्थलांतरितांना रेल्वेने पश्चिम बंगाल सीमेवर पोहोचवून त्यांना परत पाठवण्याची जबाबदारी घेतात. तेथे स्थलांतरितांना सीमा सुरक्षा दलाकडे सोपवले जाते, जे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्या समकक्षांशी समन्वय साधते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.