Sassoon Hospital : ससूनमधून शिक्के चोरीला, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्यास अटक

दोघांनी १४ डिसेंबर रोजी ससूनमधील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नजर चुकवून शिक्के चोरी केले. त्याआधारे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले.

154
Sassoon Hospital : ससूनमधून शिक्के चोरीला, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्यास अटक
Sassoon Hospital : ससूनमधून शिक्के चोरीला, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्यास अटक

ससून रुग्णालयातून शिक्के चोरी करून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश दामशेट्टी यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून प्रकाश पांडुरंग मोंडकर (वय ३४, रा. वाघेरी, ता. कणकवली, जि. सिंधदुर्ग) आणि सत्पाल पवार (रा. ओगलेवाडी, ता. कराड) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोंडकर याला पोलिसांनी अटक केली आहे. (Sassoon Hospital)

(हेही वाचा – Ayodhya Sri Ram Temple: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत, जाणून घ्या सध्याच्या ‘या’ १० घडामोडी)

या दोघांनी १४ डिसेंबर रोजी ससूनमधील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नजर चुकवून शिक्के चोरी केले. त्याआधारे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले. ही बाब समोर आल्यानंतर डॉ. दामशेट्टी यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शरद माने करीत आहेत. (Sassoon Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.