कोल्लममधील कुंडारा येथे रेल्वे ट्रॅकवर लोखंडी पोल ठेवल्याबद्दल (Train Accident) केरळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कोल्लमकडे जाणाऱ्या १६,७९१ पलारुवी एक्सप्रेसला रुळावरून घसरवण्याचा (Train Accident) आरोपींचा हेतू होता, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींची ओळख पटली असून ते पेरुम्पुझा येथील रहिवासी राजेश (३३) आणि एलामल्लूर येथील रहिवासी अरुण (३९) अशी त्यांची नावे आहेत. सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.
(हेही वाचा Shashi Tharoor काँग्रेस हायकमांडवर संतापले; म्हणाले, माझी गरज नसेल…)
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड देखील आहेत. त्याच्यावर कुंद्रा येथील एका उपनिरीक्षकावर हल्ला केल्याचा आरोप आहे. शनिवारी, २१ फेब्रुवारीला दुपारी १:३० वाजता रेल्वे ट्रॅकवर एका व्यक्तीला टेलिफोनचा खांब दिसला. त्यांनी रेल्वे गेटमनला याची माहिती दिली. यानंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ खांब हटवला. नंतर ट्रॅकवर आणखी एक खांब सापडला, ज्यामुळे संशय आणखी वाढला. पोलिसांनी दोघांवर भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 327(1) (रेल्वे, विमान किंवा मोठे जहाज नष्ट करण्याचा किंवा नुकसान करण्याचा हेतू असलेला कृत्य) आणि रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 150(1)(A) (दुर्भावनापूर्णपणे ट्रेन नष्ट करणे किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे) आणि 153 (जाणूनबुजून रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणणे) अंतर्गत आरोप लावले आहेत. (Train Accident)
Join Our WhatsApp Community