बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( Bombay Stock Exchange) ला दि. ११ मार्च रोजी बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ई -मेल पाठविणाऱ्याने इंग्रजी भाषेत पाठवलेल्या मेलमध्ये दक्षिणीतील एका राज्यात सुरू असणाऱ्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा मेल करण्यात आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात (Mata Ramabai Ambedkar Marg Police Station) या धमकीच्या मेल प्रकरणी तक्रार अर्ज देण्यात आलेला असून अर्जावरून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Stock Market)
( हेही वाचा : America ने पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांना परत पाठवले; कारण काय?)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील शेअर्स बाजार (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) कार्यालयाच्या ईमेलवर मंगळवारी एक अनोळखी व्यक्तीने ई -मेल पाठवून धमकी दिली आहे, हा ई मेल इंग्रजी भाषेत असून त्यात दाक्षिणात्य राज्यात सुरू असणाऱ्या मुद्द्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र धमकी देणाऱ्याला नेमकं काय म्हणायचे आहे, हे अद्याप लक्षात येत नसले तरी,मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून शेअर्स मार्केट (Shares Market) परिसर तपासण्यात आला मात्र पोलिसांना संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही. (Stock Market)
दरम्यान या प्रकरणी बीएसई कडून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याला (Mata Ramabai Ambedkar Marg Police Station) तक्रार अर्ज आणि धमकीचा ईमेल चे स्क्रीन शॉट देण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती माता रमाबाई आंबेडकर मार्ग (Mata Ramabai Ambedkar Marg Police Station) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे (Santosh Dhanwate) यांनी दिली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community