दोन वर्षांच्या मुलाच्या पाठोपाठ वडिलांच्या निधनामुळे मानसिक तणावात असलेल्या मूकबधिर ३० वर्षीय मातेने दीड महिन्याच्या मुलीला रहात्या इमारतीच्या १४ व्या मजल्या वरून फेकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी मुलुंड पश्चिम येथे उघडकीस आली आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलुंड पोलिसांनी मातेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मनाली संकेत मेहता (३०) असे या मातेचे नाव आहे. मनाली ही जन्मापासून मूकबधिर आहे. मुलुंड पश्चिम येथील झवेर रोड वरील निळकंठ तीर्थ या इमारतीच्या १४व्या मजल्यावर आई वडील भावा सोबत राहणाऱ्या मनालीचा विवाह गुजरात राज्यातील सुरत येथे राहणाऱ्या संकेत मेहता या मूकबधिर तरुणासोबत सन २०२० मध्ये झाला. २०२१ मध्ये या दाम्पत्याला मुलगा झाला होता. परंतु, दुर्दैवाने जुलै २०२२ मध्ये त्याच्या श्वासनलिकेत दूध अडकल्यामुळे त्याचे निधन झाले. मनालीचे वडील विनय शहा यांना नातवाचा खूप लळा लागला होता. विनय शहा यांचे डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्या नातवाच्या निधनाच्या धक्क्याने हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले.
(हेही वाचा – Pt. Bhimsen Joshi Youth Scholarship : गायन-वादन क्षेत्रातील ७ विद्यार्थ्यांना पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती जाहीर)
मुलाच्या आणि वडिलांच्या निधनामुळे मनाली तेव्हा पासून मानसिक तणावात होती. सप्टेंबर महिन्यात मानसी सुरत येथे सासरी बाळंत झाली व तीला मुलगी झाली. सासरी २१ दिवस राहिल्या नंतर तीचा भाऊ जेनील हा मनाली आणि तिच्या मुलीला घेऊन मुलुंड येथे माहेरी घेऊन आला होता. गुरुवारी सकाळी ६ वाजता मनाली हिची आई झोपेतून जागी झाली, त्यावेळी मनालीच्या कुशीत तीची मुलगी नसल्याचे बघून तिने मुलाला आवाज दिला. जेनील हा धावतच मनालीच्या खोलीकडे आला व मुलीचा शोध घेण्यासाठी इमारतीच्या खाली उतरला असता इमारतीच्या वॉचमनने इमारतीच्या मागे दोन महिन्यांची मुलगी पडली असल्याचे जेनीलला सांगितले.
जेनील ने धावत जाऊन मुलं बघितले असता ती मनालीची दोन महिन्यांची मुलगी हाशवी असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीला ताब्यात घेऊन अग्रवाल रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मुलीला मृत घोषित केले. पोलिसांच्या चौकशीत मानसिक तणावात असलेल्या मनाली हिने पहाटेच्या सुमारास पोटची दीड महिन्याची मुलगी हाशवी हिला उचलून राहत्या घरातील खिडकीतून बाहेर फेकले अशी माहिती समोर आली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी मनाली विरुद्ध मुलीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community