मालेगावच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा छळ; अधीक्षकांसह तिघेजण बडतर्फ

student harassment in malegaon hostel three dismissed including superintendent

नाशिकमधील मालेगावातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थ्यांना पहारेकऱ्यांकडून मारहाण केले जात होते. तसेच विद्यार्थ्यांना हाताने शौचालय साफ करायला लावले जात  असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी संबंधित संस्थेचे अधीक्षक, अधीक्षिका आणि पहारेकरी यांना तडकाफडकी बडतर्फ केले आहे. तसेच त्यांच्यावर कर्तव्यात कसूर आणि सेवा व अटी शर्थींच्या भंग केल्याचा ठपका ठेवला आहे.

हा धक्कादायक प्रकार मालेगावातील आदिवासी सेवा सामितीच्या सिद्धार्थ वसतिगृहात घडला आहे. विद्यार्थ्यांना पहारेकऱ्यांकडून मारहाण करण्याबरोबरच त्यांना हाताने शौचालय साफ करण्यास भाग पाडले जात असल्याचा घृणास्पद प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकृष्ठ दर्जाचे जेवण देण्यात येत असल्याचा आरोपही केला जात आहे.

(हेही वाचा – घरी सोडण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार)

वसतिगृहातील हा सर्व प्रकार बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी वसतिगृहावर धाव घेतली. त्यांनी जाब विचारत पहारेकऱ्याच्या कानशिलात लगावली, त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवून पहारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान समाज कल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here