-
प्रतिनिधी
शेअर बाजारात झालेले आर्थिक नुकसान सहन न झाल्यामुळे ३८ वर्षीय व्यक्तीने तणावातून पत्नी आणि मुलांसमोर स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना गुरुवारी पहाटे भांडुप पश्चिम येथे घडली असून या प्रकरणी पोलिसांनी शेअर ब्रोकर विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज चंद्रकांत भोसले असे या पीडित व्यक्तीने गुरुवारी पहाटे ४:३० ते ५:१५ च्या दरम्यान आपल्या निवासी इमारतीच्या पायऱ्यांवर असताना देशी बनावटीच्या पिस्तूलने गळ्यात गोळी झाडून घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजने शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली होती आणि झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे तो गंभीर मानसिक तणावाखाली होता.
(हेही वाचा – MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या; ‘या’ कालावधीत होणार परीक्षा)
घटनेच्या वेळी मनोज त्याच्या पत्नी आणि मुलांसह त्याच्या फ्लॅटमधून (फ्लॅट क्रमांक ७०५) खाली जात असताना त्याने अचानक कंबरेत लपवलेली पिस्तूल बाहेर काढली आणि गळ्यात गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांची पत्नी शुभांगी मनोज भोसले यांनी तातडीने त्यांच्या मदतीला धाव घेतली आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या शुभांगी यांनी नंतर पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला, ज्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Suicide)
(हेही वाचा – BMC : महापालिकेला लिलावातील ‘त्या’ दोन भूखंडांची किंमत का करावी लागली कमी? काय आहे कारण)
मनोजला तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी देशी बनावटीची पिस्तुल जप्त केली आहे. भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी पुष्टी केली की भोसले यांनी हे शस्त्र कसे मिळवले याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज भोसले यांनी शेअर बाजारात २३ लाख रुपये गुंतवले होते. ही रक्कम त्याने एका शेअर ब्रोकरकडे गुंतवली होती. शेअर ब्रोकरने त्याला सांगितले की, त्याने गुंतवलेले रक्कम बुडाली त्यानंतर मनोज भोसले मानसिक तणावात गेले. त्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी शेअर ब्रोकर विरोधात आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community