Suitcase Murder Case : चारित्र्याच्या संशयावरून करण्यात आली हत्या

चारित्र्याच्या संशयावरून हत्या करण्यात आल्याचा खुलासा कुर्ला सुटकेस मर्डर केस प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने केला आहे.

168
Suitcase Murder Case : चारित्र्याच्या संशयावरून करण्यात आली हत्या
Suitcase Murder Case : चारित्र्याच्या संशयावरून करण्यात आली हत्या

चारित्र्याच्या संशयावरून हत्या करण्यात आल्याचा खुलासा कुर्ला सुटकेस मर्डर केस प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने केला आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून ओडिशा येथे गावी घेऊन जाणार होता मात्र कुर्ला टर्मिनस येथे असलेल्या बॅग स्कॅनर पकडले जाऊ या भीतीने तो टर्मिनस येथून परत निघाला आणि मृतदेह असलेली बॅग कुर्ला सीएसटी रोड येथील मेट्रो कामाच्या ठिकाणी फेकून पसार झाला अशी माहिती तपासात समोर आली आहे. (Suitcase Murder Case)

प्रतिमा किसपट्टा (२५) अशी सुटकेसमध्ये मिळून आलेल्या मृत तरुणीचे नाव आहे. अस्कर मनोज बरला (२२) हा तीचा प्रियकर आहे. गुन्हे शाखा कक्ष ५ आणि कक्ष ११च्या पथकाने अस्करला ठाणे रेल्वे स्थानकाजवळून अटक केली असून तो ओडीसा येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात होता अशी माहिती पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण१) राजतीलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Suitcase Murder Case)

कुर्ला पोलिसाना रविवारी दुपारी सीएसटी रोड मेट्रो कामाच्या ठिकाणी सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला होता.मृतदेह प्रतिमा किसपट्टा (२५) या तरुणीचा असल्याचे उघड झाले असून प्रतिमा आणि तीचा ‘लिव्ह इन पार्टनर’ अस्कर हे दोघे धारावी येथे वर्षभरापूर्वीच भाड्याने राहण्यास आले होते. प्रतिमा एका खाजगी कंपनीत स्वीपरचे काम करीत होती तर अस्कर हा सायन येथे एका मिठाईच्या दुकानात काम करीत होता. प्रतिमा हिची महिन्याभरापूर्वी नोकरी गेल्यामुळे ती घरीच होती. अस्कर हा प्रतिमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यातून शनिवारी रात्री दोघात जोरदार भांडण झाले, या भांडणात अस्करने प्रतिमाचा गळा आवळून हत्या केली. (Suitcase Murder Case)

(हेही वाचा – Woman’s Body Found In Suitcase : कुर्ला सुटकेस मर्डर केस- गुन्ह्याची उकल धारावीतून एकाला अटक)

प्रतिमा मृत झाल्याचे बघून घाबरलेल्या अस्करने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरातील एक सुटकेस रिकामी केली आणि त्यात प्रतिमाचा मृतदेह दुमडून टाकला, त्यानंतर त्याने मध्यरात्रीच्या सुमारास सुटकेश कशीबशी बाहेर आणून सायनला जाण्यासाठी त्याने रिक्षा केली. सायनला रिक्षा सोडल्यानंतर त्याने पुन्हा दुसरी रिक्षा करून कुर्ला टर्मिनस (लोकमान्य टिळक टर्मिनस) गाठून मृतदेहासह ओडिशा येथे गावी जाण्याची योजना आखली. (Suitcase Murder Case)

रेल्वे टर्मिनस येथे असलेल्या बॅग स्कॅनरमुळे आपली पोलखोल होऊन पकडले जाऊ या भीतीने त्याने गावी जाणे रद्द करून पुन्हा घरी जाण्याचा विचार केला. कुर्ला टर्मिनस येथून रिक्षा केल्यानंतर तो चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड वरून कुर्ला येथे आल्यावर कुर्ला पश्चिम सिग्नल पूर्वी मेट्रोचे काम सुरू असल्याचे बघून त्याने रिक्षा तिकडेच सोडली. आजूबाजूला कोणी नसल्याचे बघून त्याने मेट्रोचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बॅग टाकून तेथून थेट धारावीतील घर गाठले अशी माहिती पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Suitcase Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.