राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Murder Case) यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दोन प्रमुख आरोपी आणि त्यांच्या साथीदाराला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस आणि राजस्थान पोलिस (Sukhdev Singh Murder Case) यांनी मिळून रविवार १० डिसेंबर रोजी मध्यरात्री या तीन आरोपींना चंदीगढ येथून अटक केली आहे.
(हेही वाचा – Padgha-Borivali : पडघा- बोरिवली येथे छापेमारीत ‘हमास’ चे झेंडे जप्त )
नितीन फौजी आणि रोहित राठोड या दोन नेमबाजांना (Sukhdev Singh Murder Case) आणि उधम या त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहितीनुसार, गुन्हे शाखेने या तिघांना (Sukhdev Singh Murder Case) चंदीगड सेक्टर-२२ येथून अटक केली. दिल्ली पोलीस याप्रकरणाची पुढील चौकशी करणार आहेत.
(हेही वाचा – Nagpur Live Cartridges : गोरेवाडात आढळली १५६ जिवंत काडतुसे; नक्षलवादी कनेक्शनच्या दिशेने तपासाला गती)
यापूर्वी शनिवारी म्हणजेच ९ डिसेंबर रोजी पोलिसांनी रामवीर या व्यक्तीला अटक केली, ज्याने (Sukhdev Singh Murder Case) हत्येनंतर रोहित आणि नितीन या हल्लेखोरांना त्याच्या दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत केली आणि त्यांना अजमेर रोडवर सोडले.
#WATCH | Delhi: The accused in the Sukhdev Singh Gogamedi murder case brought to the Crime Branch Office. https://t.co/oPuhcesScg pic.twitter.com/ynTa1HUkzN
— ANI (@ANI) December 9, 2023
मंगळवार ५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास जयदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Murder Case) हे त्यांच्या जयपूर येथील घरात चार जणांसोबत चहा पित असताना त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावेळी दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हत्येचा तपास करण्यासाठी बुधवारी (६ डिसेंबर) विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community