नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना ५ वर्षांचा शिक्षा न्यायालयाने दिला आहे. या शिक्षेनंतर त्यांची आमदारकीदेखील रद्द करण्यात आली आहे.
सरकारी वकील आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर त्यावर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एस पाटील यांच्या समक्ष दोन्ही बाजूने जामीन आणि शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी युक्तिवाद झाला. बुधवारी (२७ डिसेंबर) काय निकला येतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुनील केदार यांना जामीन मिळणार का? शिक्षेच्या स्थगितीबाबत न्यायाधीश काय निर्णय देतात यावर लक्ष आहे.
(हेही वाचा – TMC : ठाणे महापालिकेची अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई )
अँजिओग्राफी होण्याची शक्यता
काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना बँक रोखे घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने शुक्रवार रात्रीपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना छातीत दुखण्याचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना अँजिओग्राफीचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांना ताप आणि खोकला असल्यामुळे चाचण्या लांबल्या होत्या तसेच सिटीस्कॅनचे रिपोर्ट्स नॉर्मल आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातं आहे, मात्र किडनीच्या त्रासामुळे क्रिएटिन लेव्हल अजूनही वाढलेली आहे. त्यामुळे आज अँजिओग्राफी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही पहा –