वादग्रस्त महापालिका प्रशासनाधिकारी सुनिता धनगर (Sunita Dhangar) आणि शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांना ५५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
(हेही वाचा – संजय राऊतांच्या ताफ्या समोर शिंदे गटाच्या शिवसैनिकांच निदर्शन)
खासगी शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या एका शिक्षकाला संस्थेने निलंबित केले. याविरूध्द शिक्षक न्यायालयात गेला. न्यायालयाने संस्थेला शिक्षकाला कामावर रुजू करण्याचे आदेश देऊनही संस्था निलंबन मागे घेत नव्हती. याविषयी दाद मागण्यासाठी संबंधित शिक्षकाने महापालिका प्रशासनाधिकारी सुनिता धनगर (Sunita Dhangar) यांच्याकडे तक्रार केली. त्यासंदर्भातील आदेश काढण्यासाठी धनगर यांनी ५० हजार आणि त्या कार्यालयातील लिपीक नितीन जोशी याने पाच हजार रुपये शिक्षकाकडे मागितले. संबंधित शिक्षकाने त्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करुन विभागाने सापळा रचला. शुक्रवारी दुपारी धनगर आणि जोशी यांना त्यांच्या कार्यालयात लाच स्विकारतांना ताब्यात घेण्यात आले.
हेही पहा –
लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांच्या निवासस्थानी एसीबीने कारवाई केली आहे. पन्नास हजारांची लाच घेताना एसीबीने सुनीता धनगर यांना रंगेहात अटक केली होती. याच प्रकरणात सुनीता धनगर यांच्या घरातून एसीबीला मोठं घबाड मिळाल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर चौकशीदरम्यान धनगर यांच्या घरी ८५ लाख रोख रुपये, ३० तोळे सोने, राहता फ्लॅट ८५ लाखांचा तर दुसरा दीड कोटींचा असे सापडले आहेत.
Join Our WhatsApp Community