सीबीआयने मुंबईच्या सीमाशुल्क विभागाच्या अधीक्षकाला ८० हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना अटक केली. हा अधीक्षक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुरियर सेलमध्ये कार्यरत होता.
(हेही वाचा Ashadhi Wari : वारी परंपरेचे अखंडत्व कायम ठेवण्यात मोलाचे ठरलेले वीर सावरकरांचे ‘ते’ पत्र होते आहे व्हायरल)
तक्रारदाराने चीनमधून काही मशीनचे भाग आयात केले होते, जे एक कुरियर कंपनीच्या माध्यमातून मुंबई विमानतळावर 06.07.2024 रोजी पोहचले होते. जेव्हा तक्रारदार माल आणायला आला तेव्हा अधीक्षकाने त्याला आयात केलेले माल सोडण्यासाठी 2,80,000/- रुपये द्यावे लागतील. त्यानंतर, आरोपी अधीक्षकाने तक्रारदाराला जर त्याने 1,40,000/- रुपये दिले तर त्याला 2,80,000/- रुपये भरण्याची गरज भासणार नाही. मात्र तक्रारदाराने तेवढी रक्कम भरण्यास समर्थता दाखवली, तेव्हा आरोपीने ती १ लाख रुपये केली. तरीही असमर्थता दाखवल्यावर आरोपीने ८० हजार रुपये देण्याची मागणी (Bribe)केली. सीबीआयने जाळे टाकून आरोपीला ८० हजार रुपये लाच (Bribe) घेताना रंगेहात पकडले. अटक आरोपीला 17.07.2024 रोजी मुंबई येथील सक्षम न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
Join Our WhatsApp Community