Drugs Supply : युरोपियन राष्ट्रात स्नॅक्सच्या पाकीटामधून ड्रग्स पुरवठा

कैलास राजपूतसह शिराझी याला २०१३ मध्ये अमली पदार्थ तस्करी (Drugs Supply) प्रकरणी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती.

148
Drugs Supply : युरोपियन राष्ट्रात स्नॅक्सच्या पाकीटामधून ड्रग्स पुरवठा

युरोपियन राष्ट्रांमध्ये ड्रग्सचा पुरवठा (Drugs Supply) करण्यासाठी हल्दीरामच्या पाकीटाचा वापर केला जात होता अशी खळबळजनक माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेल्या अली असगर शिराझी याच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय ड्रग्स (Drugs Supply) माफिया कैलास राजपूत याला अटक झाल्यापासून त्याच्या ड्रग्सच्या धंद्यावर अली असगर शिराझी याचे नियंत्रण होते. शिराझी हा कैलास राजपूत याचा विश्वासू सहकारी असून खंडणी विरोधी पथकाने सोमवारी २२ मे रोजी दुबईला पळून जात असताना मुंबई विमानतळावरून शिराझीला अटक करण्यात आली असून राजपूतच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मंगळवारी २३ मे रोजी शिराझीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Drugs : केरळमधून १२ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त; पाकिस्तानी तस्कराला अटक)

अली असगर शिराझी याच्या चौकशीत अनेक बाबी समोर आलेल्या आहेत. २०१३ पासून, कैलाश राजपूत परदेशातून, प्रामुख्याने दुबई आणि लंडनमध्ये त्याचे गुन्हेगारी नेटवर्क चालवत होता. शिराझी आणि दानिश मुल्ला हे दोघे त्याचे जवळचे सहकारी असून दानिश मुल्ला हा फरार आहे. राजपूत याच्या अटकेनंतर शिराझी आणि दानिश हे दोघे भारतात त्यांच्या टोळीवर नियंत्रण ठेवून युरोपियन देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिकेत अमली पदार्थसह ,केटामाईन तसेच प्रतिबंधित औषधाचा पुरवठा (Drugs Supply) करीत होते. यासाठी शिराझी हा कुरिअर कंपन्याचा वापर करून हल्दीरामच्या स्नॅक्स पाकिटाचा वापर करून त्यातून अमली पदार्थ आणि प्रतिबंधक औषधांचा पुरवठा करीत होता.

हेही पहा – 

कैलास राजपूतसह शिराझी याला २०१३ मध्ये अमली पदार्थ तस्करी (Drugs Supply) प्रकरणी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. २०१४ मध्ये शिराझी तुरुंगातून बाहेर आला होता. २०२०मध्ये गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अमली पदार्थांच्या तस्करीच्या कटात सहभागी असलेले त्याचे जवळचे सहकारी आणि व्यक्तींना अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत कैलास राजपूतशी संबंध असलेल्या आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.