शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरणात Arun Gawli चा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

95
शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरणात Arun Gawli चा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरणात Arun Gawli चा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

मुंबईतील शिवसेना (Shiv Sena) नगरसेवक कमलाकर जामसांडेकर (Kamlakar Jamsandekar) यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला (Arun Gawli) जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी (20 फेब्रु.) नकार दिला आहे. मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची २००७ मध्ये हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गवळीने (Arun Gawli) २००६ च्या माफी धोरणातील सर्व अटींचे पालन केल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा-Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ तारखेपासून फेब्रुवारीचा हप्ता द्यायला सुरुवात

न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळलेल्या जामिनाप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ७ जानेवारीला गवळीला (Arun Gawli) २८ दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. नागपूर कारागृहाच्या उपमहानिरीक्षकांनी अर्ज फेटाळल्यानंतर गवळीने नागपूर खंडपीठापुढे याचिका केली होती. (Arun Gawli)

हेही वाचा-राज्याचे DCM Eknath Shinde यांची गाडी बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा बुलढाण्यातून ताब्यात

२००८ मध्ये, कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला (Arun Gawli) अटक करण्यात आली आणि त्याच्यावर खटला चालवण्यात आला. ऑगस्ट २०१२ मध्ये, मुंबईतील सत्र न्यायालयाने त्याला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.