Judge Yashwant Varma यांच्या घरात अर्धवट जळालेल्या नोटांचा सर्वोच्च न्यायालयाने Video केला जारी

Judge Yashwant Varma यांच्या घरात अर्धवट जळालेल्या नोटांचा सर्वोच्च न्यायालयाने Video केला जारी

398
Judge Yashwant Varma यांच्या घरात अर्धवट जळालेल्या नोटांचा सर्वोच्च न्यायालयाने Video केला जारी
Judge Yashwant Varma यांच्या घरात अर्धवट जळालेल्या नोटांचा सर्वोच्च न्यायालयाने Video केला जारी

शासकीय निवासस्थानी रोख रक्कम सापडल्याच्या प्रकरणावरून वादात अडकलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा (Judge Yashwant Verma) यांच्याकडे सध्या कोणतेही न्यायालयीन काम सोपवू नका, असे आदेश सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी शनिवारी दिले. १४ मार्च रोजी वर्मा यांच्या निवसस्थानी आग लागल्यानंतर तेथे रोख रक्कम सापडली होती. याबाबत अधिकृत पुष्टी करताना सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशीचा अहवाल जारी केला आहे.

हेही वाचा-शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांद्यावरील Export Duty बाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

या अहवालात दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी २१ मार्च रोजी लिहीलेल्या पत्रात न्यायमूर्ती वर्मा यांना त्यांच्या शासकिय बंगल्याच्या खोलीत पैसे/रोख रक्कम आढळल्याबद्दल विचारणा केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलीस आयुक्त संजय आरोरा यांनी सरन्यायाधीश उपाध्याय यांच्याबरोबर शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ देखील अपलोड केले आहेत. (Judge Yashwant Verma)

हेही वाचा- BMC : मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर १९१ माध्यमिक शाळेच्या शिक्षणाचा भार

या फोटो आणि व्हिडीओमध्ये अग्निशामक दलाचा जवान अर्धवट जळालेल्या नोटा प्लॅस्टीकच्या बॅगेतून बाहेर काढताना दिसत आहेत. उच्च न्यायालयाचा अहवाल सार्वजनिक करण्यापूर्वी सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या एका वरिष्ठ सदस्याला हा निर्णय कळवला असल्याचे सांगितले जात आहे. (Judge Yashwant Verma)

हेही वाचा- Mazagon Dock Share Price : माझगाव डॉकच्या शेअरमध्ये तेजी परतली

दरम्यान, न्या. वर्मा यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरन्यायाधीशांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. (Judge Yashwant Verma) या चौकशी समितीमध्ये पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जी. एस. संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्या. अनू शिवरामन यांचा समावेश आहे. (Judge Yashwant Verma)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.