Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनल हॅक!

106
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनल हॅक!
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनल हॅक!

Jभारतीय सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) अधिकृत यूट्यूब चॅनल आज, शुक्रवारी हॅक करण्यात आले आहे. चॅनलवर क्रिप्टोकरन्सी-एक्सआरपीची जाहिरात व्हिडिओ दाखवली जात होती. एक्सआरपी क्रिप्टोकरन्सी यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केली आहे.

(हेही वाचा-Mumbai Metro 3 थेट लोकलला कनेक्ट होणार! ‘असा’ असेल मार्ग)

सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) घटनात्मक खंडपीठांसमोर सूचीबद्ध प्रकरणे आणि सार्वजनिक हिताच्या प्रकरणांची सुनावणी थेट प्रवाहित करण्यासाठी युट्यूब चॅनेल वापरते. अलीकडेच कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह स्ट्रीम करण्यात आली होती हॅकर्सने हा व्हिडीओ प्रायव्हेट बनवून टाकला आहे. या व्हिडीओच्या ऐवजी या चॅनलवर क्रिप्टो करेंन्सी-एक्सआरपीच्या जाहिरातीचा व्हिडीओ दिसतोय. याबाबत सुप्रीम कोर्टाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नेमके काय झाले याबद्दल आम्हाला खात्री नाही. मात्र संकेतस्थळाशी छेडछाड झाल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर आज, शुक्रवारी सकाळी ही समस्या उघडकीस आली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आयटी टीमने ती सोडवण्यासाठी एनआयसीची मदत मागितली आहे.

(हेही वाचा-Jalna Accident : जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ६ ठार, १४ जखमी)

आजकाल, हॅकर्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय यूट्यूब चॅनेल्सला लक्ष्य करत आहेत. रिपलने स्वतःचे सीईओ ब्रॅड गार्लिंगहाऊसचे बनावट खाते तयार करण्यापासून हॅकर्सना रोखण्यात अपयशयी ठरल्याचा दावा युट्यूबवर केला आहे. तत्कालीन सरन्यायमूर्ती यु.यु. ललित यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण न्यायालयाच्या बैठकीत प्रमुख सुनावणीचे थेट प्रसारण करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत, सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये निर्णय घेतला की सर्व घटनापीठांच्या सुनावणी यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित केल्या जातील. देशात 27 सप्टेंबर 2022 रोजी पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण झाले होते. त्यावेळी तत्कालीन सरन्यायमूर्ती एन.व्ही रमणा यांनी त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी 5 प्रकरणांमध्ये निकाल दिला होता. (Supreme Court)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.