गेल्या काही दिवसांमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गुजरातमधील सुरतमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. सुरत पोलिसांना या ब्लाइंड मर्डर केसचा तपास केला आहे. सुरत शहरात अमरोली कार्यक्षेत्रात २८ नोव्हेंबरला ही घटना घडली.
( हेही वाचा : Shraddha Murder Case : जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच! वडिलांशी DNA झाला मॅच, दिल्ली पोलिसांना मोठे यश)
हत्या झालेल्या तरुणीचे नाव कुनीदास सीमादास असून ही तरुणी ओडिशातल्या भुवनेश्वर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. भुवनेश्वरमधील जगन्नाथ गौडा नावाच्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. संबंधित तरुणीला आरोपीसोबत लग्न करायचे होते म्हणून ती लग्नासाठी विचारत होती पण जगन्नाथला तिच्या लग्न करायचे नव्हते या वादातून सुटका मिळवण्यासाठी जगन्नाथ हत्येची योजना आखली.
टी-शर्टच्या आधारे तपास
आरोपीने तरुणीला सुरतमध्ये येण्यास सांगितले. ती सुद्धा काहीही विचार न करता सुरतला आली. सुरतला आल्यानंतर प्रियकर जगन्नाथने तिची चाकूने ४९ वार करत हत्या केली आणि पुन्हा भुवनेश्वरला निघून गेला. मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर सुरतमध्ये चौकशी करण्यात आली. सीसीटीव्ही तपासणी केल्यावर सुद्धा पोलिसांना ठोस माहिती मिळाली नाही परंतु मुलीने घातलेल्या टी-शर्टच्या आधारे तपास करण्यात आला. टी-शर्टमुळे ती भुवनेश्वरची असल्याचे कळाले.
सुरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत अमरोली पोलीस स्टेशन परिसरात अंजनी इंडस्ट्रियल एरियाजवळ एका शेतात पोलिसांना चाकूचे अनेक वार केलेल्या मुलीचा मृतदेह आढळला. या मुलीच्या शरीरावर तब्बल ४९ वार केले होते त्यानंतर तपास करण्यास सुरूवात केली. तपासानंतर प्रेयसीची हत्या केलेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध आयपीसीतल्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येत आरोपीशिवाय आणखी कोणाचा सहभाग होता याची चौकशी सध्या सुरू आहे.
Join Our WhatsApp Community