Suraj Nikam: ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या; कुस्ती क्षेत्रावर शोककळा

216
Suraj Nikam: 'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमची आत्महत्या; कुस्ती क्षेत्रावर शोककळा
Suraj Nikam: 'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमची आत्महत्या; कुस्ती क्षेत्रावर शोककळा

Jसांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीमधील युवा पैलवान ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ (Kumar Maharashtra Kesari) सूरज निकम (Suraj Nikam) याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सूरज याने शुक्रवारी संध्याकाळी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, आयुष्य का संपवलं याचं कारण अद्याप स्प्ष्ट झालेले नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Suraj Nikam)

कुस्ती क्षेत्रात शोककळा

सूरजच्या वडीलांचे आधीच निधन झाले होते. त्यामुळे तो व्यथित होता. सुरजच्या (Suraj Nikam) मृत्यूची बातमी समजताच कुस्ती क्षेत्रात शोककळा पसली. अनेकांनी त्याच्या अकाली मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, पैलवान सूरज निकम हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील रहिवासी आहे. त्याने त्याच्या राहत्या घरातच गळफास लावून घेतला आणि आयुष्य संपवलं. पैलवान सूरज याने आत्महत्या का केली यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकवली होती

गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकवली होती. यापूर्वी त्याने कुस्ती क्षेत्रात अनेक विजेतेपदं, किताब पटकावले आहेत. विरोधी कुस्तीपटूला पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. कुस्ती विश्वात अत्यंत कमी कालावधीत आपला दबदबा निर्माण करून कुमार केसरी होण्याचा मान त्याने मिळवला. (Suraj Nikam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.