- प्रतिनिधी
नववर्षाच्या पूर्वसंध्येला गेट वे ऑफ इंडिया आणि कुलाबा कॉजवे परिसरातून मोबाईल चोरी करणाऱ्या सुरत येथील एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने नववर्षाच्या स्वागतासाठी गेटवे आणि कुलाबा कॉजवे येथे येणाऱ्या पर्यटकांना लक्ष करून त्याचे मोबाईल फोन आणि मौल्यवान वस्तू चोरी करीत असताना ४ जणांना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून इतर दोघांचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे. (Crime)
(हेही वाचा – Property Tax : मुंबई महापालिकेकडून ६८ टक्के मालमत्ता कराची वसुली)
फिरोज शेख (४०) रफीक सलीम शेख, (२८) जुबेर पटेल (३२) आणि इमाम लतीफ, (३४) असे अटक करण्यात आलेल्या सहाजणांपैकी चौघांची नावे आहेत. इतर दोघे फारुख शेख आणि (५०) संतोष शिंदे हे दोघे घाटकोपर चिराग नगर येथील रहिवासी आहे. चौघे जण गुजरात राज्यातील सुरतचे रहिवासी आहेत. मंगळवार रात्री कुलाबा पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दाखल होताच, आमच्या पथकांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि चार संशयितांना ताब्यात घेतले, आम्ही त्यांच्याकडून सहा फोन जप्त केले, असे झोन १ चे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले (Crime)
(हेही वाचा – Political Banner : न्यायालयाची बंदी, तरीही मुंबईत राजकीय पक्षाची बॅनरबाजी जोरात!)
अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी सुरत ते मुंबई असा संपूर्ण प्रवास फक्त नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जेव्हा गर्दी जमते तेव्हा फोन चोरण्यासाठी केला. या चौघांनी प्रामुख्याने कुलाबा कॉजवे, कुलाबा बस स्टॉप आणि गेटवे ऑफ इंडिया येथून फोन चोरल्याचा आरोप आहे. कारण या ठिकाणी सर्वाधिक गर्दी होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील कॉन्स्टेबल धनराज पाटील, नीलेश मोहिते आणि रघुनाथ पाटील यांच्या पथकाने आणखी दोन संशयितांना पकडले. ३० वर्षीय फारुख शेख आणि ५० वर्षीय संतोष शिंदे हे दोघेही चिराग नगर येथील रहिवासी होते. त्यांच्याकडून चोरीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, हे दोघे नेहमीचे गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community