ATS : एटीएसकडून पाचवी अटक; झुल्फिकारचा ताबा आता एटीएसकडे

झुल्फिकार याच्यावर दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याचा दावा

161
ATS : एटीएसकडून पाचवी अटक; झुल्फिकारचा ताबा आता एटीएसकडे
ATS : एटीएसकडून पाचवी अटक; झुल्फिकारचा ताबा आता एटीएसकडे

दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्यांना एनआयएने मुंबई आणि ठाण्यातून तर राज्य एटीएसने पुण्यातून अटक केली आहे. एनआयएने मुंबई आणि ठाण्यातील पडघा येथून अटक केलेल्या संशयितांपैकी एटीएसने एकाचा ताबा घेत त्याला अटक केली. झुल्फिकार अली बडोदावाला असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ठाण्यातील पडघा येथे राहणारा बडोदावाला हा एटीएसच्या अटकेतील पाचवा संशयित आहे. झुल्फिकार हा पुण्यातून अटक करण्यात आलेल्या संशयितांना सर्व प्रकारची आर्थिक रसद पुरवत होता असा आरोप त्याच्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.

एटीएसने यापूर्वी पुण्यातील कोंढवा आणि कोथरूड मधून महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (२३), महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (२४), अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (३२) आणि अन्वर अली इद्रिस या चौघांना अटक करण्यात आली होती. अटकेत असलेले चौघे एनआयएने पडघ्यातून अटक करण्यात आलेला झुल्फिकार याच्या संपर्कात होते आणि झुल्फिकार हा दहशतवादी कृत्यासाठी या चौघांना रत्नागिरी येथुन अटक केलेल्या अब्दुल कादिर पठाण याच्या मार्फत आर्थिक रसद पुरवत असल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, एटीएसने एनआयआयच्या अटकेत असलेल्या झुल्फिकार याचा ताबा घेत त्याला अटक केली आहे. एटीएसने अटक केलेले संशयित ‘अलसुफा’ या संघटनेचे सदस्य असून अलसुफा ही संघटना ‘इसिस’ संघटनेशी संबंधित आहे.

(हेही वाचा – Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्येमागचे कारण आले समोर)

एनआयएने मागील महिन्यात इसिस संघटनेशी संबंधित मुंबईतील नागपाडा येथून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. एटीएस आणि एनआयएने पुणे, ठाणे आणि मुंबईतून अटक करण्यात आलेल्या संशयितयांचे एकमेकांशी असलेले संबंध समोर आले असून हे दोन्ही इसिसने तयार केलेले मॉड्युल असून या दोन्ही मॉड्युलला इसिसने दोन वेगवेगळी नावे दिली होती. या दोन्ही मॉड्युलकडून एटीएस आणि एनआयए या तपास संस्थेने आक्षेपार्ह साहित्य, तसेच बॉम्ब तयार करण्याचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि बॉम्ब सदृश वस्तू जप्त केल्या होत्या. पुणे आणि मुंबई ही शहरे या संशयित दहशतवाद्यांच्या यांच्या निशाण्यावर होती. व या दोन्ही शहरात २६/११ पेक्षा मोठा घातपात घडवून आणायचा होता अशी माहिती तपास यंत्रणेच्या चौकशीत समोर आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.