Jalgaon मध्ये 19 किलो गांजासह संशयित आरोपीला अटक

154

Jalgaon : राज्यात मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी अमली पदार्थांच्या (Drug smuggling) घटना वाढत आहेत. अशातच जळगाव शहरासह जिल्हादेखील अमली पदार्थांचा केंद्रबिंदू बनत आहे. त्यातच आता कासोदा येथे गांजा तस्करीबाबत (Kasoda ganja smuggling) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कासोदा पोलीस ठाणे (Kasoda Police Station) परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याच्या माहितीवरून एका संशयित आरोपीला १९ किलो गांजा व मोटारसायकल असा एकुण २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुद्ध एनडीपीएस कारवाई करण्यात आली आहे. (Jalgaon) 

कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस स्टेशन हद्दीत वेशांतर करुन मागील ५ दिवसांपासून सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपुत व त्यांच्या पथकाने गांजा पकडण्यासाठी सापळा रचला होता. सुरवातीचे ४ दिवस अपयश आले. परंतु २५ फेब्रुवारीला पेट्रोलिंग दरम्यान वनकोठे गावाजवळ सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपुत (API Nilesh Rajput)  पोउनि, दत्तु खुळे, पोहेकों नंदलाल परदेशी, पोकों समाधान तोंडे, पोकों लहु हटकर यांना एरंडोल कडून कासोदाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोठे गावाजवळ एक संशयित व्यक्ती त्याच्या मोटार सायकलवर प्लास्टीकच्या गोणीत गांजा घेवून जात असल्याची माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून त्याची मोटारसायकल पाठलाग करून थांबवली. त्याचे मोटारसायकल वरील गोणी चेक केली असता त्यात खाकी रंगाचे पॅकींग टेपने पैक केलेले चौकोनी आकाराचे पुडे मिळुन आले ते फोडुन चेक केले असता त्यामध्ये गांजा मिळुन आला.

(हेही वाचा – ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी; DCM Eknath Shinde यांचे निर्देश)

संशयीत व्यक्ती अजय रविंद्र पवार (वय २७ रा. सोनबडी ता. एरंडोल) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडुन १९ किलो गांजा व मोटारसायकल असा एकुण २,८०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गांजाची वाहतुक करणाऱ्या इसमाविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनावर परिणाम करणारे एनडीपीएस अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शन सपोनि. निलेश राजपुत पोउनि दत्तु खुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल परदेशी, पोना अकील मुजावर,  किरण गाडीलोहार, नरेद्र गजरे, समाधान तोंडे, लहु हटकर अशांनी कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि निलेश राजपुत हे करीत आहेत.  

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.