UP Madarsa : देशविरोधी कारवाया असल्याचा संशय; मदरशांवर होणार मोठी कारवाई

राज्यात चालवल्या जाणाऱ्या मदरशांना परदेशी निधीतून मिळणारा पैसा धर्मांतरासारख्या उपक्रमांवर खर्च होत असल्याच्या तक्रारींवर उत्तरप्रदेश सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.

207
UP Madarsa : देशविरोधी कारवाया असल्याचा संशय; मदरशांवर होणार मोठी कारवाई
UP Madarsa : देशविरोधी कारवाया असल्याचा संशय; मदरशांवर होणार मोठी कारवाई

राज्यात चालवल्या जाणाऱ्या मदरशांना परदेशी निधीतून मिळणारा पैसा धर्मांतरासारख्या उपक्रमांवर खर्च होत असल्याच्या तक्रारींवर उत्तरप्रदेश सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. (UP Madarsa) विशेष तपास पथकाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये चालवल्या जाणाऱ्या 4000 हून अधिक मदरशांची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) अतिरिक्त महासंचालक मोहित अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक (SIT)  मदरशांना मिळणाऱ्या परदेशी निधीची चौकशी करणार आहे.

(हेही वाचा – Israel-Palestine conflict : इस्रायलकडून भारताने काय शिकावे ?)

एसआयटीमध्ये सायबर क्राईमचे पोलीस अधीक्षक डॉ. त्रिवेणी सिंग आणि अल्पसंख्यांक कल्याण विभागाचे संचालक जे. रिवा यांचाही समावेश आहे. मदरशांना मिळणारा परदेशी आणि बेकायदेशीर निधी एस.आय.टी. शोधून काढेल. परदेशातून येणाऱ्या पैशातून ते राष्ट्रविरोधी आणि बेकायदेशीर धर्मांतर उपक्रमांना प्रोत्साहन देत असल्याचा संशय आहे. (UP Madarsa)

परकीय चलन खात्याच्या (ईईएफसी) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची माहिती मागण्यासाठी सर्व मदरशांना सूचना जारी केल्या जातील. त्यानंतर ज्या मदरशांना परदेशातून पैसे पाठवले जात आहेत, त्यांची यादी केली जाईल. त्यानंतर हा पैसा कोणत्या देशातून पाठवला गेला आणि कोणत्या कामांमध्ये वापरला गेला, याची चौकशी केली जाईल. त्यात 16 हजार 513 अधिकृत आणि 8 हजार 500 मदरसे अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. या अनधिकृत मदरशांवर विदेशातून देणग्या येत असल्याचा आरोप आहे. याचीच चौकशी आता केली जाणार आहे.

उत्तरप्रदेशमधील तराई जिल्ह्यातील मदरशांची संख्या यात अधिक आहे. हे मदरसे नेपाळच्या सीमेवर आहेत आणि त्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या सीमेवर १ सहस्र ५०० हून अधिक अनधिकृत मदरसे आहेत, तसेच नेपाळ सीमेवर मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. नेपाळ सीमेवरील लखीमपूर खेरी, पीलीभीत, श्रावस्ती, सिद्धार्थनगर आणि बहराईच येथे, तसेच जवळपासच्या इतर अनेक भागांत एक हजाराहून अधिक मदरसे चालवले जात आहेत. गेल्या काही दिवसांत या भागातील मदरशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्याच वेळी या मदरशांना परदेशी निधीची माहितीही मिळाली होती. (UP Madarsa)

या आधारावर अल्पसंख्यांक विभागाने अनेक जिल्ह्यांमधील मान्यताप्राप्त नसलेल्या मदरशांची देखील तपासणी केली होती. त्यामध्ये असे उघड झाले की, अनेक मदरशांना उत्पन्नाचा स्रोत म्हणून परदेशी निधी मिळाला होता. एटीएसने अलीकडेच बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या घुसखोरांच्या टोळीतील तीन सक्रिय सदस्यांना अटक केली आहे. घुसखोरांना मदत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दिल्लीतील स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तीन वर्षांत 20 कोटी रुपयांचा परदेशी निधी पाठवण्यात आल्याचे तपासात उघड झाले. (UP Madarsa)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.