काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान (Naseem Khan) यांच्या मागावर असलेल्या दोन संशयित तरुणांना साकिनाका पोलिसांनी अटक केली आहे.या दोन संशयितापैकी एक जण नसीम खान यांच्या पाळतीवर होता, तसेच त्याने नसीम खान यांच्या कार्यालयाची रेकी करताना खान यांच्या अंगरक्षकानी त्याला ताब्यात घेऊन साकिनाका पोलिसांच्या ताब्यात दिले. या संशयिताकडे मिळून आलेल्या मोबाईल फोन मध्ये पोलिसांना सांकेतिक भाषेतील संभाषण मिळून आले आहे. साकिनाका पोलिसांनी या संशयिताला अटक केल्यानंतर त्याचा दुसऱ्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर असून साकिनाका पोलीस ठाण्यासह मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे.
(हेही वाचा- Maharashtra Assembly Election Result : निकालानंतरही Nana Patole यांचा एकांगी लढा कायम राहणार!)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी एक संशयित तरुण काँग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री नसीम खान (Naseem Khan) यांच्या कुर्ला जरीमरी येथील कार्यालया जवळ संशयास्पद फिरताना आढळून आल्याने खान यांच्या अंगरक्षकानी त्याला पकडून साकिनाका पोलिसांना कळवले. साकिनाका पोलिसांनी तात्काळ खान यांच्या कार्यालयाकडे धाव घेऊन संशयित तरुणाला ताब्यात घेऊन, त्याच्याजवळून मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल ताब्यात घेतली.
या संशयिताला पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली असता हा संशयित इसम मूळचा मेरठ येथील राहणारा असून १५ नोव्हेंबर रोजी संशयित तरुण आणि त्याचे दोन सहकारी मुंबईत दाखल झाले होते. १५ नोव्हेंबर पासून हे संशयित तरुण नसीम खान यांच्या पाळतीवर होते, त्यांनी खान यांच्या कार्यालयाची तसेच निवडणूक कार्यालयाची रेकी केल्याचे चौकशीत समोर आले, दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाचा मोबाईल फोन तपासला आता त्याच्या व्हाट्सएपवर सांकेतिक भाषेत संभाषण आढळून आले आहे. या सांकेतिक संभाषणावरून पोलिसांना त्यांच्यावरील संशय अधिक बळावला असून पोलिसांनी तात्काळ त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याचा शोध घेऊन आणखी एकाला ताब्यात घेऊन दोन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीच्या चौकशीत हे प्रकरण गंभीर असल्याचे समोर आले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानी तात्काळ साकिनाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तपास सुरू केला आहे. नसीम खान हे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असून १५ नोव्हेंबर रोजी नसीम खान यांनी साकिनाका येथे सभा घेतली होती, या सभेसाठी काँगेसचे नेते सचिन पायलट हे स्वतः हजर असताना एका संशयित तरुणाने नसीम खान आणि सचिन पायलट तसेच इतर काँग्रेसचे नेते बसलेल्या व्यासपिठावर जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अंगरक्षक आणि खान यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला रोखून सभेच्या बाहेर काढले होते, अशी माहिती स्वतः नसीम खान यांनी हिंदुस्थान पोस्ट शी बोलताना दिली. (Naseem Khan)
(हेही वाचा- Maharashtra Vidhansabha Result : २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी, काय आहे निवडणूक आयोगाची व्यवस्था)
मला यापूर्वी कधी कुणाची धमकी आली नाही, तसेच १५ नोव्हेंबर रोजी घडलेला प्रकार आम्ही गंभीरपणे घेतला नव्हता, परंतु गुरुवारी माझ्या कार्यालय जवळ रेकी करताना एक संशयित मिळून आल्याने त्याला आम्ही साकिनाका पोलीसांच्या ताब्यात दिले असे नसीम खान यांनी सांगितले. (Naseem Khan)
मुंबई गुन्हे शाखा आणि साकिनाका पोलीस ठाण्याचे एक पथकया प्रकरनाचा तपास करीत असून अटक करण्यात आलेल्या त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत असून त्याचा नेमका हेतू काय होता याचा तपास सुरू आहे. सध्या नसीम खान यांची सुरक्षा वाढविण्यात आली असून त्याच्या कार्यालय आणि घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आसल्याचे पोलीसानी सांगितले. (Naseem Khan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community