खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आलेला नवी मुंबई पोलिस दलातील पोलीस हवालदार याने स्वतःला आध्यात्मिक गुरू बनवून लोकांना लुटण्याचे काम सुरू केले होते. या आध्यात्मिक गुरू निलंबित पोलिसांला त्याच्या पत्नीला आणि मुलाला अंधश्रद्धा जादूटोणा कायदा, बलात्कारच्या गुन्ह्यात कळवा पोलिसांनी अटक केली आहे. गोकुळ जाधव (४५) आणि अनिरुद्ध (२१) असे अटक करण्यात आलेल्या निलंबित पोलीस उर्फ आध्यात्मिक गुरू आणि त्याच्या मुलाचे नाव आहे. गोकुळ हा नवी मुंबई पोलीस दलात पोलिस हवालदार होता, अनेक वर्षांपूर्वी त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.
ठाणे कळवा येथील विटावा येथे पत्नी आणि मुलगा अनिरुद्ध सोबत राहणारा गोकुळ जाधव याला पोलीस खात्यातुन निलंबित करण्यात आल्यानंतर त्याने आध्यात्मिक गुरू (मांत्रिक) बनून लोकांना गंडवू लागला होता. २०२१ मध्ये त्याने एक महिला या कथित आध्यात्मिक गुरू गोकुळ जाधव याच्या संपर्कात आली. त्याने हातचलाखी करून पीडित महिलेचा विश्वास संपादन केला त्यानंतर पीडित महिलेला तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असून ती महिला तुला ठार करून तुझ्या पतीसोबत राहणार आहे, असे सांगून तीच्या मनात भीती निर्माण केली.
यावरून त्याने तीला पूजा पाठ करण्याचा सल्ला देऊन त्यातून तोडगा काढण्याचे आश्वासन देऊन पीडितेला घरी बोलावुन त्याची पत्नी आणि मुलगा अनिरुद्ध याच्यासोबत ओळख करून दिली. मार्च २०२१ मध्ये पीडित महिलेने पतीला या महिलेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी कथित आध्यात्मिक गुरू जाधव यांच्या घरी गेली. पीडित महिलेने पोलीस जबाबात म्हटल्याप्रमाणे कथित आध्यात्मिक गुरू जाधव यांनी तीच्यावर मंत्रोच्चार करून तिला पिण्यासाठी पाणी दिले आणि तिला त्याच्या घरी पूजा सत्रात उपस्थित राहण्याची सूचना केली. तीने पूजा सत्रात येण्यास नकार दिल्यास तिचा पतीची कथित मैत्रीण तिला मारून टाकेल, असा इशारा त्याने दिला. पीडितेने सांगितले की मार्च २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान जाधवने तिला कथित विधींसाठी सतत बोलावले.
(हेही वाचा – P.L. Deshpande : पु.ल. देशपांडे लिखीत ‘एक झुंज वार्याशी’ २५वा प्रयोग रसिकांसाठी केवळ २५ रुपयांत)
विधी दरम्यान, त्याने तिला गोळ्या आणि पाणी दिले, ज्यामुळे तीची शुद्ध हरपली. एका विधीवेळी गोकुळ जाधव याचा मुलगा अनिरुद्ध उपस्थित होता आणि कथित विधी कार्याचा वेळी गोकुळ जाधव याने अनिरुद्धला पीडितेचा पती बनवुन पीडितेला अनिरुद्धच्या बेडरूममध्ये नेण्यात आले जिथे त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला. अखेर महिलेने शेवटी अत्याचार उघड करण्याचे धाडस दाखवले, व गोकुळ जाधवने गोळ्या आणि पाणी पिण्यासाठी दिले मात्र तीने त्या वस्तू टाकून दिल्या त्यानंतर ती काही प्रमाणात शुद्धीवर येऊ लागली आणि तीची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतर पीडितेने गोकुळ जाधव त्याची पत्नी आणि मुलाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली.
कळवा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांखाली आणि महाराष्ट्र प्रतिबंध व निर्मूलन मानवी बलिदान आणि इतर अमानुष, वाईट आणि अघोरी प्रथा आणि काळी जादू कायदा, २०१३ च्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केपी थोरात म्हणाले, “आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. एकेकाळी नवी मुंबई पोलिसांत हवालदार असलेल्या जाधव यांना खंडणीच्या आरोपानंतर दशकभरापूर्वी निलंबन करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांनी आध्यात्मिक गुरूची भूमिका स्वीकारली. अधिकाऱ्यांनी जाधव यांच्या मालकीच्या महागड्या मालमत्तेचा पर्दाफाश केला असून पुढील तपास सुरू झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community