Swargate Bus Depot : आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

66
Swargate Bus Depot : आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी
Swargate Bus Depot : आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात (Swargate Bus Depot) शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर सर्व स्तरातून घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) (वय ३६) याला पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे. त्याला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : IND vs NZ सामन्यात ‘हे’ ५ खेळाडू ठरू शकतात न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ; तर विराट कोहली खेळणार ३०० वा वनडे सामना)

आरोपी गाडेने (Dattatray Gade) तरुणीकडे वाहक असल्याचं भासवत तरूणीला शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगितलं. त्यानंतर तिच्या मागे जाऊन तिला अडवलं आणि तिच्यावर अत्याचार केला अशी माहिती या घटनेनंतर समोर आली होती. मात्र, या घटनेनंतर अनेक धक्कादायक दावे केले जात आहेत. त्याचबरोबर हा अत्याचार नसून दोघांच्याही समंतीने संबंध प्रस्थापित झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. (Swargate Bus Depot)

दरम्यान, या घटनेनंतर फरार झालेल्या दत्ता गाडेला 70 तासांनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) त्याची पहिली वैद्यकीय तपासणी तसेच लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. लैंगिक क्षमता चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यानंतर आता गाडेची (Dattatray Gade) डीएनए (DNA) चाचणी करण्यात येणार आहे. याशिवाय आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फोरेन्सिक लॅबला पाठवले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.