स्वारगेट बलात्कार (Pune Rape Case) प्रकरणाने (Swargate Bus Depot) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. आरोपी गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. गुरूवारच्या मध्यरात्री (27 फेब्रु.) अखेर तो सापडला. शिरूर तालुक्यातील कनाट गावातील उसाच्या चारीत तो लपला होता. स्वारगेट पोलिसांच्या (Swargate Police) तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते, सागर केकान, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडले. दत्तात्रय गाडे पाणी मागण्यासाठी येऊन गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात गस्त घालत, डॉग स्कॉडच्या मदतीनं त्याच्या अटकेची कारवाई पूर्ण केली. (Swargate Bus Depot)
नेमकं काय घडलं ?
गाडे (Dattatray Gade) रात्री बाराच्या सुमारास गावातील नातेवाईकाच्या घरी पाणी पिण्यासाठी आला होता. त्याला भूक लागली होती. तिथं दत्तात्रय गाडेनं जे काय केलं, त्याचा पश्चाताप झाल्याचं म्हटलं. याशिवाय गाडेनं प्रचंड भूक लागली असून काही तरी खायला द्या असं सांगितलं. नातेवाईकांनी काही खायला न देता फक्त पाण्याची बाटली दिली. त्यानंतर गाडे त्या घरातून निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी यासगळ्या घटनाक्रमाची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांची पूर्ण टीम अॅक्टिव्ह झाली, डॉग स्कॉड आलं, 13 टीम तैनात झाल्या. दत्तात्रय गाडे दोन दिवस उसाच्या शेतात लपून बसला होता. उसात जाऊन पोलिसांनी गाडेला अटक केली आहे. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे. यानंतर तपासाची पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. (Swargate Bus Depot)
बिबट्याची भीती वेगळीच …
गुरुवारी दुपारीच १५० ते २०० पोलीस या गनाट गावात दाखल झाले आणि त्यानंतर सुरू झाली सर्च मोहीम. गनाट गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या ठिकाणी दत्ता गाडेचा शोध सुरू झाला. या गावाच्या आजूबाजूला उसाची शेती आहे. आरोपी या उसाच्या शेतात लपला असावा अशी शक्यता गृहीत धरून शोध सुरू झाला. उसाच्या शेतात जाऊन, खबरदारी बाळगत पोलीस त्याचा शोध घेऊ लागले. जमिनीवरून पोलीस तर आकाशातून ड्रोन या नराधमाचा शोध घेत होते. मात्र हाती काहीच लागत नव्हतं. जसा जसा अंधार पडू लागला तसा तसा पोलिसांच्या चिंतेत मात्र वाढ झाली. शिरूर तालुक्यातील हे गाव बिबट्याच वावर असलेलं क्षेत्र म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे बिबट्याची भीती वेगळीच होती. (Swargate Bus Depot)
सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. मात्र बलात्कार प्रकरणातील हा आरोपी सापडल्याने पुणे पोलिसांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. आरोपी दत्ता गाडे सध्या स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे. आज (28फेब्रु. ) त्याला कोर्टात हजर केले जाईल. त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर या संपूर्ण घटनेची दुसरी बाजू समोर येईल. (Swargate Bus Depot)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community