आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी अलीकडेच मुख्यमंत्र्यांच्या (Arvind Kejriwal) निवासस्थानी झालेले गैरवर्तन आणि हल्ल्याच्या प्रकरणी पोलिसांकडे अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी त्याच्याकडून माहिती घेण्यासाठी पोलिसांचे पथक आज, गुरुवारी त्याच्या घरी गेले होते. या वेळी त्यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याबाबत त्यांचे जबाब नोंदवल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.
(हेही वाचा – Lok Sabha : राहुल गांधी आणि प्रियंका पळपुटे भावंडं : दिनेश शर्मा)
पोलीस पथकाने घेतली घटनेची माहिती
मालीवाल यांच्या घरी पोहोचलेले पोलिस पथक 4 तासांपेक्षा जास्त काळ तिथे होते. पोलीस पथकाने अतिरिक्त पोलीस आयुक्त पी.एस. कुशवाह (P.S. Kushwaha) यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दीड वाजेच्या सुमारास राज्यसभा सदस्य मालीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन घटनेची माहिती घेतली. त्यांच्यासोबत एक महिला पोलीस अधिकारीही होती. यापूर्वी सोमवारी स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गैरवर्तन आणि मारहाण झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आधी मुख्यमंत्र्याच्या निवास स्थानाहून पोलिसांना फोन केला होता, त्यानंतर त्यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन गाठले.
महिला आयोगाचा बिभव कुमार यांना समन्स
केजरीवाल यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यातील बिभव कुमार याने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, त्यावेळी पोलिसांकडे लेखी तक्रार न देताच त्या परतल्या होत्या. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी 14 मे रोजी आपचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेताना सांगितले होते की, ही अत्यंत निंदनीय घटना आहे आणि अरविंद केजरीवाल याप्रकरणी कठोर कारवाई करतील. त्यानंतर आज, गुरुवारी उत्तरप्रदेश दौऱ्यात केजरीवालांना याप्रकरणी प्रश्न केले असता त्यांनी मौन धारण केले. खासदार मालीवाल यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने मारहाणीचा आरोप असलेले केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांनी समन्स बजावत उद्या, शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे. (Swati Maliwal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community