Tahawwur Rana ची अटक; १५ वर्षांनंतर आणखी उलगडणार मुंबई हल्ल्याचा कट

तहव्वुर राणाची (Tahawwur Rana) शिकागोमध्ये डेव्हिड कोलमन हेडलीशी मैत्री झाली. दोघेही जुने मित्र असले तरी ते अनेक वर्षांनी भेटले आणि ही मैत्री पुन्हा घट्ट झाली. मुंबई हल्ल्यापूर्वी २००६ ते २००८ पर्यंत हेडलीने अनेक वेळा भारताला भेट दिली. त्याने मुंबईची रेकी केली.

61

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड Tahawwur Rana याला अमेरिकेने भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई हल्ल्याचा कट उलगडणार आहे. या हल्ल्याचा Tahawwur Rana हा मुख्य सूत्रधार होता, त्यामुळे त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीचा भारतीय तपास यंत्रणांना अधिक फायदा होणार आहे.

तहव्वुर राणाचे (Tahawwur Rana) तब्बल १५ वर्षानंतर भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. तो पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा सहकारी असल्याचे मानले जाते. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण १६६ लोक मारले गेले.

(हेही वाचा OM Certificate : हिंदू सणांमध्ये नाशिक झाले ‘ओम’ मय)

डॉक्टर बनला दहशतवादाचा मास्टरमाइंड

तहव्वुर हुसेन राणाचा (Tahawwur Rana) जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चिचावतनी येथे झाला. तहव्वुर हुसेन राणा याचे पालनपोषण पाकिस्तानात झाले. त्याने वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर झाला.  नंतर तो १९९७ मध्ये कॅनडाला गेला. २००१ मध्ये त्याला कॅनेडियन नागरिकत्व मिळवले. तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याने अमेरिकेतील शिकागो येथे इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली. इतर व्यवसायही सुरू केले आणि एक व्यावसायिक बनला.

राणा हेडलीचे कट कारस्थान

तहव्वुर राणाची (Tahawwur Rana) शिकागोमध्ये डेव्हिड कोलमन हेडलीशी मैत्री झाली. दोघेही जुने मित्र असले तरी ते अनेक वर्षांनी भेटले आणि ही मैत्री पुन्हा घट्ट झाली. मुंबई हल्ल्यापूर्वी २००६ ते २००८ पर्यंत हेडलीने अनेक वेळा भारताला भेट दिली. त्याने मुंबईची रेकी केली. मुंबईला वारंवार येणाऱ्या भेटींबद्दल संशय येऊ नये म्हणून त्याने मुंबईत तहव्वुर राणाच्या (Tahawwur Rana) ट्रॅव्हल एजन्सीची शाखा उघडली. असे म्हटले जाते की दोघांचेही लष्करशी संबंध होते आणि ते दहशतवादी संघटनेच्या सूचनेनुसार हे सर्व करत होते. राणाच्या फर्मने हेडलीला पाच वर्षाचा बिझनेस व्हिसा देण्यास मदत केली होती. आपल्या कार्यालयातून दहशतवादी घटनेचे नियोजन करण्यास सांगितले होते. राणाने हेडलीला दहशतवादी हल्ल्यासाठी आर्थिक रसदही पूरवली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.