कोठडीत Tahawwur Rana अदा करतो ५ वेळा नमाज; कुराण आणि पेन देण्याची प्रशासनाकडे मागणी

एनआयएच्या मुख्यालयातील त्याच्या कोठडीत Tahawwur Rana दररोज पाच वेळा नमाज अदा करताना दिसतो.

61

मुंबईवर २६/११ या दिवशी (26 / 11 Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रमुख सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा (Tahawwur Rana) याचे अमेरिकेने भारताकडे प्रत्यार्पण केल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याचा ताबा घेतला आहे. दिल्लीतील विशेष एनआयए (National Investigation Agency) न्यायालयाने १८ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर एनआयएने तहव्वूर हुसेन राणा याची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. या चौकशी दरम्यान राणाने कुराण (Quran), पेन आणि कागदांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – १३ एप्रिल १९१९ या दिवशी British सरकारने केला होता रक्तपात; नेमके काय घडलेले?)

तहव्वुर राणा याला नवी दिल्लीतील (New Delhi) सीजीओ कॉम्प्लेक्समधील एनआयएच्या मुख्य कार्यालयात अत्यंत सुरक्षित कक्षात ठेवण्यात आले आहे. तिथे सुरक्षा कर्मचारी चोवीस तास पहारा देत आहेत.

Tahawwur Rana ला वेगळी वागणूक नाही

एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तहव्वुर राणा याला इतर अटक केलेल्या व्यक्तींप्रमाणेच वागणूक दिली जात असून, त्याला कोणतीही विशेष वागणूक दिली जात नाही. त्याच्या विनंतीनुसार त्याला कुराणची प्रत देण्यात आली आहे. एनआयएच्या मुख्यालयातील त्याच्या कोठडीत तो दररोज पाच वेळा नमाज अदा करताना दिसत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दर ४८ तासांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. (Tahawwur Rana)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.