
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याला गुरुवारी (१० एप्रिल) संध्याकाळी भारतात आणण्यात आले. तहव्वुर राणाला पालम विमानतळावरून थेट दिल्लीतील एनआयए मुख्यालयात आणण्यात आले आणि नंतर पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने मास्टरमाइंड राणाला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. (Tahawwur Rana)
हातात-पायात बेड्या, कंबरेत साखळी
अमेरिकन पोलिसांनी तहव्वुर राणाला एनआयएकडे सोपवले आहे. याचे एक चित्र समोर आले आहे. चित्रात असे दिसून येते की, जेव्हा तहव्वुर राणाला भारताच्या स्वाधीन करण्यात आले तेव्हा त्याच्या हातात हातकड्या होत्या आणि त्याच्या कमरेला साखळी बांधलेली होती. (Tahawwur Rana)
१८ दिवस कोठडीत
तहव्वुर राणाला घेऊन विमान काल संध्याकाळी ६:३० वाजता दिल्लीत उतरले, त्यानंतर एनआयएने त्यांना तात्काळ अटक केली. सर्वप्रथम, तेहव्वुरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर, त्याला येथून थेट एनआयए न्यायालयात नेण्यात आले. एनआयए न्यायालयाने त्याला १८ दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. (Tahawwur Rana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community