श्रद्धा हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देश हादरलेला असतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. छत्तीसगढमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला२०० किलोमीटर लांब ओरिसामध्ये नेऊन तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर या तरूणीचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला.
( हेही वाचा : कोहलीची ‘विराट’ कामगिरी; अशी कामगिरी करणारा जगातील पहिला क्रिकेटर)
तनु कुर्रे ही तरूणी रायपूरमधील एका खासगी बॅंकेमध्ये नोकरीला असताना तिची ओळख बालनगीर येथील व्यावसायिक सचिन अग्रवाल यांच्याशी झाली. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २१ नोव्हेंबरला तनुचा फोन बंद असल्याने घरचे तिच्याशी संपर्क साधू शकले नाहीत. यानंतर घाबरलेल्या नातेवाईकांनी रायपूर गाठले आणि तनु बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
बेपत्ता झाल्याची तक्रार झाल्यानंतर सुद्धा आरोपी सचिन अग्रवाल तनुच्या घरच्यांशी संपर्कात होता. लवकरच लग्न होईल असे आश्वासन त्याने तिच्याही कुटुंबीयांना दिले होते. याबाबत त्याने स्क्रिशॉट सुद्धा दाखवले परंतु प्रत्यक्ष चित्र वेगळेच होते. सचिनने तनुला गोळ्या घालून ठार केले आणि त्यानंतर तिचा मृतदेह बालंगीरच्या जंगलात पेट्रोल टाकून फेकून दिला. ओरिसा पोलिसांना मृतदेह सापडला पण त्यांना मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती त्यांना रायपूर पोलिसांशी संपर्त साधला आणि मृतदेहाची ओळख पटली.
नेमके प्रकरण काय?
या खून प्रकरणावर रायपूरचे सहपोलीस आयुक्त प्रशांत अग्रवाल यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, हे दोघेही आधीच ओळखत होते. मुलीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. यानंतर चौकशीत तनु आणि सचिन ओरिसात गेल्याचे कळाले. तरुणीचे त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचे सचिनला कळाले याच रागातून त्याने संबंधित तरुणीची हत्या केली.
Join Our WhatsApp Community