Crime News : बनावट स्वाक्षरी करून रेल्वे तिकिटे कन्फर्म करून विक्री करणाऱ्या चहा विक्रेत्याला अटक

61
Crime News : बनावट स्वाक्षरी करून रेल्वे तिकिटे कन्फर्म करून विक्री करणाऱ्या चहा विक्रेत्याला अटक
  • प्रतिनिधी

रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चहा वाटप करणाऱ्या चहा विक्रेत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांचा वापर करून व्हीआयपी कोट्याअंतर्गत रेल्वे तिकिटे कन्फर्म करण्यासाठी रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चहा विक्रेता या माध्यमातून दरमहा दीड ते दोन लाख रुपये कमाई करीत होता असा अंदाज मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाने व्यक्त केला आहे. दोन वर्षांपासून तिकीट कन्फर्म करण्याचे रॅकेट चालविणाऱ्या रवींद्र साहू या चहा विक्रेत्याने या पैशातून बिहार येथे त्याच्या गावी कोट्यवधी रुपयांचा बंगला बांधला असल्याची माहिती समोर येत आहे. रवींद्र साहू याच्यावर रेल्वे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे सुरक्षा दलाकडून तपास सुरू आहे. (Crime News)

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र साहू हा मूळचा बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात राहणारा आहे. काही वर्षांपूर्वी तो मुंबईत आला आणि रेल्वे अधिकारी कॅन्टीनमध्ये काम करू लागला. रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याना चहा वाटप करता करता अधिकारी वर्गाशी त्याचे चांगले नाते तयार झाले होते. रवींद्र साहूला अधिकारी यांच्या केबिनमध्ये थेट प्रवेश मिळत होता. साहूने याचा गैरफायदा घेत त्याने वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि मुख्य अभियंते यांच्या बनावट सील आणि स्वाक्षऱ्यांचा वापर केल्याचा आरोप आहे. (Crime News)

(हेही वाचा – Shivaji Park मधील विहिरी गेल्या कुठे? बाहेरुन टँकरद्वारे आणून शिंपडले जाते मैदानात पाणी)

साहू हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांचा वापर करून व्हीआयपी कोट्याअंतर्गत रेल्वे तिकिटे कन्फर्म करण्यासाठी रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले. रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) तपास सुरू केला आहे आणि रेल्वे फसवणुकी प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे कायदा अंतर्गत त्याच्याकडे चौकशी सुरू असून लवकरच त्याच्याविरुद्ध सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Crime News)

असा उघडकीस आला प्रकार 

मुख्य दक्षता निरीक्षक जितेंद्र शर्मा आणि आर. एस. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दक्षता पथकाने कोलकाता मेलची तपासणी केली तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला. प्रवाशांच्या पडताळणी दरम्यान काही प्रवाशांनी कन्फर्म तिकिटांसाठी जास्त पैसे दिल्याचे कबूल केले. यामुळे सखोल चौकशी सुरू झाली, ज्यामुळे साहूला अटक करण्यात आली. तपासकर्त्यांना संशय आहे की हे रॅकेट किमान तीन महिन्यांपासून कार्यरत होते, परंतु रेल्वे अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की ते दोन वर्षांपासून चालू होते, यातून साहू ला दरमहा दीड ते दोन लाख रुपयांची कमाई होत होती, त्याने कोट्यवधी रुपये कमावले असून या पैशातून त्याने बिहार येथे गावी एक कोटींचा बंगला बांधल्याची चर्चा आहे. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.