तेलंगणा राज्यात जूनमध्ये अमली पदार्थ तस्करीची मोठी कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात पंचवटी पेठफाटा परिसरातून संशयित लक्ष्मी ताठे व त्यांचा मुलगा विकास ताठे यांना तेलंगणाच्या वारंगल आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या दामेरा पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवार, १० जुलै रोजी अटक केली. पंचवटी पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई केली. दुपारी तेलंगणा (Telangana) पोलीस या मायलेकाला घेऊन पंचवटीतून रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ताठे यांची यापूर्वीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Worli Hit and Run Case: मिहीर आणि राजऋषीच्या माहितीत तफावत; पोलिसांनी सांगितले मिहीर शहाचे कारनामे!)
१९० किलो गांजा जप्त
अमली पदार्थ विरोधी कारवाई करताना तेलंगणा राज्याच्या वारंगल पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या दामेरा पोलिसांनी गांजाच्या तस्करी प्रकरणात नाशिकच्या पंचवटी भागात बुधवारी कारवाई केली. दामेरा पोलिसांचे पथक पंचवटीत आले होते. पंचवटी पोलिसांना त्यांनी कारवाईबाबत माहिती देऊन एक पथक सोबत घेत संशयित ताठे मायलेकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करत पथक दामेराकडे रवाना झाले. दामेरा पोलिसांनी ८ जून २०२४ रोजी त्या भागात १९० किलो गांजा पकडला होता.
या प्रकरणात बीड, अहमदनगर येथून दोन तस्करांना अटक केली. त्यांच्या चौकशीत हा गांजाचा साठा नाशिकच्या पंचवटी भागात या ताठे नामक महिलेकडे पोहोच केला आणार असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे पोलिसांनी नाशिकमध्ये (Nashik) येऊन लक्ष्मी व विकास या दोघांना ताब्यात घेतले. यापूर्वीही २०१८ व २०१९ साली नाशिकमध्ये गुन्हे शाखांच्या पथकांनी गांजा तस्करीमध्ये लक्ष्मी ताठे व अन्य संशयितांना अटक केली होती.
यापूर्वीही झाली होती अटक
२०१८ साली औरंगाबादरोडवरील एका संशयास्पद गोदामावर छापा टाकून नाशिकच्या गुन्हे शाखेने तब्बल ३४ लाख ५० हजार रुपये किमतीचा ६९० किलो गांजा हस्तगत केला होता. हे गोदामदेखील ताठे हिच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले होते. या वेळी तिचा जावई संशयित सुमित बोराळे व त्याचा साथीदार सुरेश महाले, लक्ष्मी हाते यांना अटक करण्यात आली होती. (Telangana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community