Telegram ॲपचे CEO पावेल डुरोव यांना अटक

181
Telegram ॲपचे CEO पावेल डुरोव यांना अटक
Telegram ॲपचे CEO पावेल डुरोव यांना अटक

टेलिग्राम (Telegram) मेसेजिंग ॲपचे अब्जाधीश संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव (Pavel Durov) यांना पॅरिसमधील बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुरोव हे आपल्या खासगी जेटने शनिवारी परदेशात निघाले होते. त्यावेळी त्यांना फ्रान्स पोलिसांनी अटक केली आहे. टेलिग्राम ॲप संबंधी प्राथमिक चौकशीसाठी त्यांना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा –Ashish Shelar यांचा पीए असल्याचे भासवून फसवणूक, वांद्रे पोलिसांनी केली कारवाई)

टेलिग्रामवरील मजकुरावर कमी नियंत्रण असणे, शिवाय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य चालणे याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे समजते. युक्रेनचे प्रमुख झेलेन्स्की यांनी टेलिग्रामचा वापर प्रामुख्याने संवादासाठी केला आहे. मॉस्कोकडून देखील युद्धासंबंधी बातम्या पोहोचवण्यासाठी याचा वापर करण्यात आला आहे. टेलिग्रामवर मुख्यत: अनफिल्टर मजकूर शेअर करत असल्याचा आरोप आहे. (Telegram)

(हेही वाचा –Rain Update : गोदावरीला पुन्हा पूर! दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी)

अल्पवयीनांविरुद्ध हिंसाचार रोखण्याचे काम असलेल्या कार्यालयाने, फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर धमकी, संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाचा प्रचार यासह कथित गुन्ह्यांच्या प्राथमिक तपासात डुरोव यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले होते, अशीही माहिती मिळत आहे. टेलिग्राम हे प्रामुख्याने रशिया, युक्रेन आणि सोवियत रशियामधील देशामध्ये प्रसिद्ध आहे. फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, टीकटॉकनंतर टेलिग्राम हे सर्वात मोठे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. येत्या काळात टेलिग्रामचे युझर्स हे १ अब्ज होण्याची शक्यता आहे. (Telegram)

टेलिग्राम दुबईमध्ये सुरू झाले असले तरी त्याची स्थापना रशियातील पावेल दुरोव यांनी केली आहे. दुरोव यांनी रशियन सरकारसोबत झालेल्या मतभेदानंतर २०१४ मध्ये रशिया सोडला होता. (Telegram)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.