लेडी ड्रग्स माफिया शशिकला पाटणकर उर्फ बेबी पाटणकर फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. तिच्या अटकपूर्व जामिनावर ३० सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयात निर्णय होणार असून तिने तपास यंत्रणेला सहकार्य करावे असा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. शशिकला उर्फ बेबी पाटणकर ही मुंबईतील सर्वात मोठी ड्रग्स माफिया आहे. तिच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल असून अनेकवेळा तीला अटक झालेली आहे.
काही वर्षांपूर्वी बेबी पाटणकर व मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार धर्मराज काळोखे यांना अटक करण्यात आली होती. या दोघांकडून मोठ्या प्रमाणात एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यात बेबी पाटणकर आणि काळोखे हे दोघे जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान बेबी पाटणकर विरुद्ध नुकताच वरळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कस्टम क्लिअरन्सचे काम करणारे किरीट सुरेश चव्हाण (६१) यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेकडून वरळी पोलीस ठाण्यात बेबी पाटणकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(हेही वाचा – PM Narendra Modi : काशीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा फायदा पूर्वांचलला होणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी)
पाच किलो सोन देण्याच्या नावाखाली बेबी पाटणकरने तक्रारदार चव्हाण यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतले व त्यांना सोन न देता त्यांची फसवणूक केल्याची तक्रार चव्हाण यांनी गुन्हे शाखेकडे केली होती. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष १ कडून करण्यात येत आहे, दरम्यान या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी बेबी पाटणकर हिने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने बेबी पाटणकरला अटकेपासून तात्पुरता दिलासा देत तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहे. बेबी पाटणकर हिच्या अटकपूर्व जामिनावर ३० सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार असून तो पर्यत बेबी पाटणकरला अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community