एका भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (12 जाने.) नवी मुंबईत (Navi Mumbai Accident) घडली आहे. या घटनेचा अंगावर काटे आणणारा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात दुचाकीवरील तरुणी चेंडूसारख्या हवेत उडाल्याच्या दिसत आहेत. या घटनेनंतर आरोपी कार चालक कारसह घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी या प्रकरणी स्कोडा (Skoda) चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार मालकाची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्हीच्या मदतीने कारचा क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली. (Navi Mumbai Accident)
ℕ𝔸𝕍𝕀 𝕄𝕌𝕄𝔹𝔸𝕀 | Tragedy Strikes on Palm Beach Road: Two Young Women Killed in Fatal Accident Navi Mumbai witnessed a devastating accident on Palm Beach Road, resulting in the loss of two young lives. A speeding Skoda car collided with a scooter, claiming the lives of two… pic.twitter.com/puqULada8Y
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) January 13, 2025
तिथे उपस्थित नागरिकांनी या दोघींना तातडीने लगतच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच संस्कृतीने (22) अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर काही वेळाने अंजलीने (19) उपचारादरम्यान प्राण सोडला. या दोन्ही तरुणी तुर्भे (Turbhe) येथील बीपीओमध्ये टेलिकॉलर (Telecaller) म्हणून अमेरिकन कंपनीसाठी नोकरी करत होत्या. संस्कृती ही कामोठे सेक्टर -18 मध्ये, तर अंजली कोपरखैरणेच्या बोनकोडे गावात राहत होती. त्या रविवारी सकाळी तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीतील रात्रीची शिफ्ट संपवून घरी जात होत्या. (Navi Mumbai Accident)
संस्कृती व अंजली या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या. त्या एकाच स्कुटरने घरी जात होत्या. संस्कृती ही प्रथम अंजलीला घरी सोडायची. त्यानंतर स्वतः घरी जायची. रविवारी सकाळी त्या स्कुटरवरून घराकडे निघाल्या होत्या. त्यांची स्कुटर कोपरा पुलाजवळील सर्व्हिस रोडने पाम बीच रस्त्यावर आली. तिथे वाशीच्या अरंजा सर्कल येथे ठाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कोडा कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीवरून तरुणी एखाद्या चेंडूसारख्या हवेत उडाल्या. त्या गंभीर जखमी झाल्या, व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Navi Mumbai Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community