Pakistan मधून शस्त्रे मागवणारी दहशतवादी टोळी गजाआड; पंजाब पोलिसांची मोठी कारवाई

464
पंजाब राज्यातील अमृतसर पोलिसांनी पाकीस्थानमध्ये दहशतवादी मॉड्यूल चालवणाऱ्या हरविंदर सिंग रिंडा टोळीतील सदस्यांना अमृतसर पोलिसांच्या पथकाने (Harvinder Singh Rinda gang) १० जणांना अटक  केली आहे. या आरोपींकडून एक हँडग्रेनेड, एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच या टोळीतील सदस्यांनी गुरबक्ष नगर या बंद पोलीस चौकीवर २९ नोव्हेंबर रोजी सकाळी हातबॉम्ब (hand grenade) फेकल्याची माहिती मिळाली आहे. हे आरोपी ड्रोनच्या मदतीने पाकिस्तानातून शस्त्रे मागवत असत. (Pakistan)

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी मॉड्यूल चालवणाऱ्या १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ४ लोक दहशदवादी मॉड्यूल चालवत होते, तर ६ लोक लॉजिस्टिक मदत करत होते. त्यांच्याकडून एक हँड ग्रेनेड, तीन पिस्तूल आणि एक चायनीज ड्रोन जप्त करण्यात आला आहे.

(हेही वाचा – जातीयवाद मुक्त राष्ट्र, ही बाबासाहेबांची इच्छा; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांचे उद्गार)

पंजाब पोलिसांनी दिली माहिती 
पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही माहिती दिली. गौरव यादव यांनी लिहिले- बटाला येथील पोलिस अधिकाऱ्याच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यासाठी हे मॉड्यूल जबाबदार होते. याशिवाय पोलिस ठाण्यांवर हल्ला करण्याचा कटही रचला जात होता. अटक केलेल्या आरोपींची नावे अर्जुन, लवप्रीत, दिलप्रीत, बसंत सिंग, अमनप्रीत, बरिंदरपाल, राजबीर, हरजोत, झ्वेगल मसिह आणि विश्वास मसीह. तर, अवतार सिंग आणि गुरनाम सिंग यांना यापूर्वीच पकडण्यात आले आहे.
अमृतसरमधील बॉम्बस्फोटामागील गुन्हेगार अमृतसर आणि पंजाबमधील बॉम्बस्फोट आणि दहशतवादी घटनांमागे हॅप्पी पासियानचे नाव समोर आले आहे. ४ डिसेंबरच्या रात्री अमृतसरच्या गुरबक्ष नगर चौकी बॉम्बस्फोटाची जबाबदारीही हॅप्पी पासियानं घेतली होती. याशिवाय अजनाळ्यातील पोलिस ठाण्याबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे. अजनाळा बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी पसियानच्या आई आणि बहिणीला अटक केली होती.

(हेही वाचा – Devendra Fadnavis यांचा राजकीय प्रवास; घरातून कसे मिळाले राजकारणाचे धडे?)
अमेरिकेत राहतोय हॅप्पी पासियान
हरप्रीत सिंग उर्फ ​​हॅप्पी पासियान हा कुख्यात दहशतवादी असून तो सध्या अमेरिकेत राहत आहे. तो पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (Babbar Khalsa International) आणि आयएसआयचा (ISI) सदस्य हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा यांच्या सूचनेनुसार काम करतो.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.