Terrorists : पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या निशाण्यावर ‘चाबड हाऊस’?; पोलीस यंत्रणा सतर्क

188
Terrorists : पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या निशाण्यावर 'चाबड हाऊस'?; पोलीस यंत्रणा सतर्क

काही दिवसांपूर्वी पुण्यातून अटक करण्यात आलेल्या चार (Terrorists) दहशतवाद्यांकडून चाबड हाऊसचा नकाशा आढळून आल्याने पुन्हा खळबळ माजली आहे. त्यामुळे आता त्या चार दहशतवाद्यांचा चाबड हाऊसवर डोळा होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या असून चाबड हाऊसच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

नेमका प्रकार काय?

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला मुंबईतील कुलाबा येथील चाबड हाऊसचे फोटो दहशतवाद्यांकडून (Terrorists) सापडल्याने खळबळ माजली आहे. एटीएसने काही दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. हे दोघेही राजस्थानमधील रतलाम येथील असून ते आता महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींवर NIA कडून पाच लाख रुपये बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेली होते. त्याचबरोबर हे आरोपी अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा देखील तपासातून समोर आले आहे.

(हेही वाचा – ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ च्या कारवाईने अस्वस्थ तरुणाची आत्महत्या)

26/11 तील लक्ष्यांपैकी एक

26/11 हल्लाच्या वेळी दहशतवादी (Terrorists) हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या चाबड हाऊसचे गुगल फोटो या व्यक्तीकडे सापडले आहे. या दोन आरोपींना हल्ल्याचा कट रचल्याबद्दल राजस्थानमधून अटक करण्यात आली. दरम्यान, या घडामोडीनंतर पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंबई पोलिसांना या संदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलिसांकडून मॉकड्रीलही सुद्धा घेण्यात आले.

चाबड हाऊस म्हणजे काय?

चाबड हाऊस हे चाबड चळवळीद्वारे पारंपारिक यहुदी धर्माचा प्रसार करण्याचे केंद्र आहे . चाबड घरे चबड शालियाच (दूत) आणि शालुचा (दूतासाठी स्त्री) आणि त्यांचे कुटुंब चालवतात. ते शहरांमध्ये आणि कॉलेज कॅम्पसच्या जवळ असतात. चाबडच्या घरात स्थानिक ज्यू समुदायासाठी आणि पर्यटकांसाठी कार्यक्रम, उपक्रम आणि सेवा आयोजित केल्या जातात.

एटीएसची कौतुकास्पद कामगिरी

एटीएसकडून (Terrorists) मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तसेच यांना पुण्यात घर घेऊन देणारा आणि नोकरी देणारा अब्दुल पठाण याला शुक्रवारी (२८ जुलै) अटक करण्यात आली होती. दरम्यान आज म्हणजेच शनिवारी (२९ जुलै) पुन्हा एटीएसने रत्नगिरी येथून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आणखी एकाला अटक केली. त्यांचा आणखी एक साथीदार महम्मद शहनवाज आलम (वय ३१) पसार झाला असून, ‘एटीएस’कडून त्याचा शोध सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.