Thane Crime: ठाण्यात घडला गंभीर प्रकार! चिखलाचे पाणी उडाले म्हणून, चालकावर केला चाकूने वार

264
Thane Crime: ठाण्यात घडला गंभीर प्रकार! चिखलाचे पाणी उडाले म्हणून, चालकावर केला चाकूने वार
Thane Crime: ठाण्यात घडला गंभीर प्रकार! चिखलाचे पाणी उडाले म्हणून, चालकावर केला चाकूने वार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे ‘ठाणे’ अशी ठाण्याला ओळख मिळाली आहे. तसेच चिंचोळया गल्ल्या, अरुंद रस्ते यामुळे ठाणे शहर नेहमीच वाहतुकीच्या दृष्टीने वर्दळीचे समजले जाते. अशातच ठाणे येथे एक विचित्र घटनेने ठाण्यातील रिक्षा चालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ठाण्यात एका रिक्षा चालकाकडून पादचारी नागरिकावर रस्त्यावरील पावसाचे पाणी उडाले त्यामुळे पादचारी शहबाज खान या नागरिकाने थेट चाकू हातात घेत रिक्षा चालकाला दम भरला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. रिक्षा चालक घटनेत गंभीर जखमी झाला आहे, चाकूने वार केल्यामुळे रिक्षा चालक पूर्णपणे घाबरुन गेला, घटनेने रिक्षा चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.  (Thane Crime)

(हेही वाचा – Gold Earrings Designs For Daily Use : मुलींना रोजच्या वापरासाठी सोन्याच्या कानातल्यांच्या वेगवेगळ्या डिझाइन्स)

ठाण्यात शुक्रवारी (१४ जुलै) रोजी घोडबंदर परिसरात (Ghodbunder area) ही घटना घडली आहे, रस्त्यालगत पादचारी  शहबाज खान आणि रिक्षाचालकात भांडण सुरु झाली, भांडणाचे स्वरुप रौद्र झाले आणि खान नामक व्यक्तीने थेट चाकू काढत रिक्षा चालकावर धावून गेला, अशी माहिती रिक्षाचालकाने एफआयआर नोंदवताना दिली आहे. या घटनेनंतर रिक्षा चालक संघटना कठोर कारवाईची मागणी करत आहे.  (Thane Crime)

(हेही वाचा – Gold Earrings Designs For Daily Use : मुलींना रोजच्या वापरासाठी सोन्याच्या कानातल्यांच्या वेगवेगळ्या डिझाइन्स)

संबंधित प्रकरणावर पोलिसांनी दिली की, वादाची मुळ सुरुवात चिखलामुळे झाली, रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले होते, रिक्षा चालक रिक्षा नेताना रिक्षाचे एक चाक त्या खड्ड्यात गेले आणि चिखलाचे पाणी शहबाज खान याच्या अंगावर उडाले त्यानंतर बाचाबाची झाली आणि रिक्षा चालक भाडे सोडण्यासाठी पुढे निघून गेला पण परत त्याच मार्गावरुन रिक्षा परतत असताना रिक्षा चालकावर शहबाज खान चाकू घेवून धावून गेला आणि भांडणांचे स्वरुप बदलले शहनाजने रिक्षा चालकावर सपासप वार केले अशी माहिती मिळत आहे. (Thane Crime)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.